आमदार निलेश राणेंची मध्यरात्री धाड : भाजप कार्यकर्त्याच्या घरी लाखोंची रोख रक्कम जप्त…

⚡मालवण ता.२६-:मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज रात्री सात वाजण्याच्या सुमारास मालवण बाजारपेठेतील एका भाजपा कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरात आपल्या कार्यकर्त्यांसह जात धाड टाकली. या धाडीत आम. निलेश राणे यांना खोलीतील एका कॉटवर लाखो रुपयांनी भरलेली पैशाची बॅग आढळून आल्यानंतर त्यांनी मालवण नगरपालिका निवडणुकीत निर्णय अधिकारी आणि मालवण पोलिसांना माहिती देत त्यांना घटनास्थळी पाचारण…

Read More

२६/११ हल्ल्यातील शहीदांना कणकवलीत वाहिली श्रद्धांजली…

⚡कणकवली ता.२६-: २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, जवानांना कणकवलीत अभिवादन करण्यात आले. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हल्ल्यातील वीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नाणचे, अशोक करंबेळकर, गोपुरी आश्रमचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, उपाध्यक्ष व्ही. के. सावंत, संदीप सावंत, अर्पिता…

Read More

ठाकरे सेनेला मोठे बळ; आमदार महेश सावंत आजपासून सावंतवाडी वेंगुर्लत प्रचारासाठी मैदानात उतरणार…

⚡सावंतवाडी-:दादर-माहीम मतदारसंघाचे ठाकरे सेनेचे आमदार तसेच सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख महेश सावंत आजपासून सावंतवाडी व वेंगुर्ला नगरपरिषद निवडणूक प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यांच्या आगमनाने ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. थोड्याच वेळात ते सावंतवाडीत दाखल होणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराला अधिक वेग येणार तसेच शिवसेनेला जोरदार बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Read More

शिक्षकांच्या टी. ई. टी. सक्ती व इतर प्रलंबित प्रश्नी ५ डिसेंबरला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन व महामोर्चा…

शिक्षक समितीचा सक्रिय सहभाग;जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस.. ⚡ओरोस ता.२६-: शिक्षकांच्या टी.ई.टी. सक्ती व इतर प्रलंबित प्रश्नांबाबत ५ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण राज्यभर शाळा बंद आंदोलन व महामोर्चा काढण्याचे नियोजन शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीने केले असून सदर आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग सर्व ताकदीनिशी उतरणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस यांनी सांगितले आहे.शिक्षकांना…

Read More

सिद्धगडाला बेकायदेशीर उत्खननाचा धोका…

बाबा मोंडकर:मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार.. ⚡मालवण ता.२६-: मालवण तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या सिद्धगडच्या पायथ्याशी असलेल्या काळ्या दगडाच्या क्रशरमुळे ऐतिहासीक गडाला धोका निर्माण होत असल्याने त्याठिकाणच्या ग्रामस्थांनी आपल्याकडे तक्रार दिलेली आहे. ही तक्रार घेऊन आपण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधणार आहे अशी माहिती भाजप शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी देत शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख…

Read More

माणगाव दत्तमंदिर मध्ये उद्या पासून श्री दत्तजयंती उत्सव…

कुडाळ : माणगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री दत्त मंदिरात दि. २८ नोव्हेंबर २०२५ ते ०५ डिसेंबर २०२५ या कालावधीत श्री दत्तजयंती उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज स्थापनित हे मंदिर दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांनी उजळून निघणार आहे.उत्सवाच्या प्रारंभी दि. २८ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर दररोज सायं. ७.३० वा. पुराणवाचन,…

Read More

मोती तलाव हा शहराचा श्वास; मालकी गेल्यास सावंतवाडीचाच श्वास जाईल…

अँड. दिलीप नार्वेकर:काँग्रेसला सत्ता दिल्यास पाणीपट्टी व घरपट्टी ५० टक्के माफ.. ⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी मोती तलाव शहरवासीयांचा श्वास आहे, मात्र या मोतीतलावाच्या मालकीवरुन न्यायालयात दावा सुरु आहे. भविष्यात हाच तलाव नगरपरिषदेच्या हातून गेल्यास सावंतवाडीचा श्वास जाईल असे मतकॉग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष ॲड.दिलीप नार्वेकर यांनी दिली. तर जनतेने काँग्रेसच्या हातात सत्ता दिल्यास सर्वप्रथम पाणीपट्टी, घरपट्टी…

Read More

संविधानाने दिलेले कर्तव्य, जबाबदारी आनंदाने पार पाडूया…

संविधान दिनानिमित्त उमेश गाळवणकर यांचे आवाहन.. कुडाळ : जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणजे भारतीय राज्यघटना. या संविधानाने दिलेली जबाबदारी, कर्तव्य आनंदाने पार पाडूया आणि देश बलसागर बनवूया. असे जेव्हा होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने संविधान दिन साजरा केल्याचा आनंद- समाधान मिळेल. असे प्रतिपादन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केले. बॅरिस्टर नाथ…

Read More

भाजपच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांनी घेतले खा. नारायण राणे यांचे आशीर्वाद…

⚡सावंतवाडी ता.२६-:सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ. श्रद्धाराजे भोंसले यांनी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांच्यासह सौ. नीलमताई राणे यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्रीना. नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले आदी उपस्थित होते.यावेळी खा. नारायण…

Read More

शिंदे शिवसेनेच्या ममता वराडकर यांनी घेतला राणेंचा आशीर्वाद…!

⚡मालवण ता.२६-: मालवण नगरपरिषद निवडणूक 2025 साठी शिवसेना नगराध्यक्षा उमेदवार सौ. ममता वराडकर यांनी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, सौं. निलमताई राणे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक उमेदवार दिपक पाटकर, शहर संघटक राजू बिडये, निकीत वराडकर यांसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page