⚡सावंतवाडी ता.२४-:
रॉंग साईडने येणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याची घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उपरलकर देवस्थानच्या वळणावर घडली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
दुचाकीस्वाराच्या डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे सुदैवाने त्याचा जीव वाचला. मात्र या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती देत जखमी दुचाकीस्वारास प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
