शिरगाव गावची ग्रामदैवता श्री. पावणाई देवीच्या चरणी नतमस्तक होऊन…

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा शुभारंभ..

⚡देवगड ता.२४-:
शिरगाव गावची ग्रामदैवता श्री. पावणाई देवीच्या चरणी नतमस्तक होऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप–शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. शिरगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्री. देवदत्त दामोदर कदम, शिरगाव पंचायत समिती गटाच्या उमेदवार कु. शितल सुरेश तावडे तसेच तळवडे पंचायत समिती गटाच्या उमेदवार सौ. सलोनी संतोष तळवडेकर यांच्या प्रचाराचा प्रारंभ शिरगाव गावची ग्रामदेवता श्री. पावणाई देवीच्या देवालयात श्रीफळ वाढवून करण्यात आला.

या वेळी उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी एकजुटीने काम करून मोठ्या विजयाचा निर्धार व्यक्त केला.या प्रचार शुभारंभ प्रसंगी शिरगाव जिल्हा परिषद गटातील भाजप जिल्हा सरचिटणीस श्री. संदीप साटम यांच्यासह मिलिंद साटम, अमित साटम, सुभाष नार्वेकर, दाजी राणे, राजू शेट्ये, मंगेश लोके, शैलेंद्र जाधव, नाना तावडे, सुनील कांडर, सुभाष थोरबोले, सत्यवान कदम, रवींद्र पवार, परशुराम पवार, देवेंद्र पवार, अरविंद पवार,

अजित परब, वैभव भाटकर, रोहन तावडे, केतन धुळप, बंडू माने, महेश मेस्त्री, वसंत साटम, उल्हास परब, विश्वनाथ परब, रत्नदीप कुवळेकर, अमित घाडी, पंकज दुखडे, महेश पवार, ओमकार तावडे, गोपीनाथ तावडे, युधी राणे, प्रसाद तावडे, सचिन तळवडेकर, किशोर तळवडेकर, अपूर्वा तावडे, दीप्ती तावडे, प्रल्हाद तावडे, भिकाजी राणे, सुनील गावडे, श्वेता शिवलकर, सुनील वळंजू, सुदर्शन साळकर, ऋषिकेश कांडर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page