जिल्हा परिषद दोन तर तीन पंचायत समित्या विजयी..
⚡देवगड ता.२४-: तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्याने पाच जागांवर निवडणूक न होता भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे देवगड तालुक्यात भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पडेल जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या सुयोगी रविंद्र घाडी या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना (उबाठा)च्या स्नेहल सत्यवान मेस्त्री आणि अपक्ष उमेदवार अंकिता सुहास वाडेकर यांनी अर्ज मागे घेतले.
पडेल पंचायत समिती मतदारसंघातून भाजपचे अंकुश यशवंत ठूकरूल बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना (उबाठा)चे शशांक शरद तावडे आणि अपक्ष उमेदवार सुहास वसंत वाडेकर यांनी अर्ज मागे घेतले.
नाडण पंचायत समिती मतदारसंघातून भाजपचे गणेश सदाशिव राणे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात अपक्ष मकरंद यशवंत जोशी आणि शिवसेना (उबाठा)चे सुहास वसंत वाडेकर यांनी अर्ज मागे घेतले.
बापर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या अवनी अमोल तेली या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या रेश्मा रविंद्र सावंत यांनी अर्ज मागे घेतला.
बापर्डे पंचायत समिती मतदारसंघातून भाजपच्या संजना संजय लाड या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना (उबाठा)च्या सुलोचना सिताराम धुरी यांनी अर्ज मागे घेतला.
अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेमुळे या पाचही मतदारसंघांमध्ये थेट बिनविरोध निकाल लागला असून देवगड तालुक्यात भाजपला मोठे यश मिळाल्याचे चित्र आहे.
