Headlines

शिवजयंतीचे औचित्य साधून मोरयाचा धोंडा ते राजकोट समुद्र किनारी स्वच्छता मोहीम संपन्न…

माजी खासदार नीलेश राणे यांच्या संकल्पनेतून युवा मोर्चाचे राबवला उपक्रम मालवण दि प्रतिनिधीशिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून भाजप पदाधिकारी, मालवण शहर भाजपा युवा मोर्चा व शिवप्रेमींच्या माध्यमातून शुक्रवार दांडी येथील मोरयाचा धोंडा ते राजकोट या समुद्र किनारपट्टी भागात स्वच्छता मोहिम राबवत किनारपट्टी स्वच्छ करण्यात आली. अशी माहिती…

Read More

…अन्यथा अतिक्रमण हटविण्यासाठी कायदेशीर कारवाई

मालवण (प्रतिनिधी) मालवण बंदर जेटी परिसरातील महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या मालकीच्या वाहनतळ जागेतील दुकान, स्टॉल, नौका आदी अतिक्रमणे येत्या चार दिवसात हटविण्यात यावीत अशा आशयाच्या नोटीसा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या आदेशान्वये मालवण बंदर विभागाने स्टॉल धारक व इतर अशा एकूण २३ जणांना बजावल्याने खळबळ उडाली असून येत्या चार दिवसात अतिक्रमणे न हटविल्यास अतिक्रमण हटाव मोहिमेंतर्गत ही अतिक्रमणे…

Read More

शिवसेना नावासह चिन्ह शिंदेंना मिळाल्याने मालवणात जल्लोष…

मालवण (प्रतिनिधी) निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला देण्याचा निर्णय दिल्याने मालवण बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भरड नाका येथे फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणा देत जल्लोष साजरा केला. शिवसेना पक्षावरून उद्धव ठाकरे व शिंदे गट यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत आज निवडणूक आयोगाने शिवसेना…

Read More

हा सत्याचा नाही, असत्याचा विजय

आज निवडणूक आयोगावरचा विश्वास उडाला: खास.संजय राऊत ⚡कणकवली ता.१७-: श्रीरामाचा धनुष्यबाण रावणाला मिळत असेल, तर सत्यमेव जयतेऐवजी असत्यमेव जयते म्हणावं लागेल. खरेदी-विक्री कुठपर्यंत गेली आहे, हे आता स्पष्ट झालं.’खोक्यांचा वारेमाप वापर झाला. हा खोक्यांचा विजय आहे. हा सत्याचा नाही, असत्याचा विजय आहे. जो पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी आणि लाखो शिवसैनिकांनी रक्त आणि बलिदान देऊन उभा केला,…

Read More

कणकवलीत १९ ते २१ फेब्रुवारी कालावधीत महोत्सव

एम एस ई बी, भाजप आणि आई चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन;केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची माहिती ओरोस ता.१७-: आपल्या एम एस ई बी, भारतीय जनता पक्ष आणि आई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत शिवजयंती निमित्त सांस्कृतिक महोत्सव, यानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी…

Read More

मडुऱ्यात शॉर्टसर्किटमुळे काजू बागायतीला आग

⚡बांदा ता.१७-: महावितरण अधिकार्‍यांच्या गलथानपणाचा फटका शेतकर्‍यांना बर्‍याच वेळा सहन करावा लागतो. असाच प्रकार मडुरा डीगवाडी येथे घडला आहे. शॉर्टसर्किटमुळे ठिणगी उडून शेतकरी प्रकाश वालावलकर यांच्या आंबा व काजू बागायतीला आज दुपारी आग लागली. मात्र, वालावलकर कुटुंबियांच्या अथक प्रयत्नांमुळे आग तातडीने विझविण्यात यश आले. महावितरण अधिकार्‍यांच्या कामचुकारपणा बद्दल प्रकाश वालावलकर यांनी संताप व्यक्त केला.      …

Read More

कोलगाव अंगणवाडी नं ३ मध्ये शिवजयंती निमित्त वेशभूषा स्पर्धा संपन्न

⚡सावंतवाडी ता.१७-: कोलगाव येथील अंगणवाडी नंबर ३ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त लहान मुलांसाठी वेशभुषा स्पर्धा घेण्यात आली. यावेळी १८ मुलांनी सहभाग दर्शविला. शिवाजी महाराज, जिजामाता, बाजी प्रभू, सईबाई, येसूबाई अशी विविध रूपे मुलांनी साकारली, जय शिवाजी जय भवानी, हर हर महादेव च्या घोषणांनी प्रत्येक मुलांनी आपली कला सुंदर रित्या हावभावा सहित सादर केली….

Read More

बनावट दागिने गहाण ठेवल्या प्रकरणी दोघांना सशर्त जामीन

⚡सावंतवाडी ता.१७-: बनावट दागिने बँकेत गहाण ठेवत 5 लाख रुपये कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या 7 पैकी 2 आरोपींना प्रत्येकी 15 हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. याकामी अँड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले आहे.

Read More

कुणकेश्वर यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज

⚡देवगड ता.१७-: देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रौत्सवा करीता सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन सज्ज झाले असून उपविभागीय पोलीस अधिकारी १ पोलीस निरीक्षक ६ सहाय्यक पोलीस निरीक्षक ६ पोलीस उपनिरीक्षक १० असे एकूण २३ पोलीस अधिकारी आणि पुरुष व महिला पोलीस कर्मचारी १३० एकूण १५३ पोलीस अधिकारी कर्मचारी, याबरोबरच होमगार्ड…

Read More

शिक्षिका तेजश्री भोकरे यांना राज्यस्तरीय नवदुर्गा समाज पुरस्कार जाहीर

देवगडमहाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन आयोजित विशेष समारंभ ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय नवदुर्गा सन्मान सामाजिक बालशिक्षण क्षेत्रातील यशस्वी आदर्श नवदुर्गा नडगिवे खारेपाटण येथील आदर्श शिक्षिका सौ.तेजश्री विजय भोकरे याना जाहीर झाला आहे.या सन्मानाचे वितरण राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे रविवार दि.५ मार्च २३ रोजी दु.१ते ४ या वेळात होणार आहे.या सन्मानबद्दल…

Read More
You cannot copy content of this page