Headlines

मोचा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मच्छिमारांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना

⚡मालवण ता.१०-: बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या मोचा चक्रीवादळामुळे दि. १० व ११ मे रोजी पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून याबाबत जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील मच्छिमारांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन मालवण येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयाच्या सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनी केले आहे. बंगालच्या…

Read More

सिप्लाच्या कॅम्पस इंटरव्हयूमध्ये भोसले नॉलेज सिटीचे सुयश…

फार्मसीच्या 25 तर पॉलिटेक्निकच्या 14 विद्यार्थ्यांची निवड.. ⚡सावंतवाडी ता.१०-: येथील भोसले नॉलेज सिटीमध्ये देशातील आघाडीची औषध कंपनी सिप्ला फार्मास्युटिकल्सतर्फे कॅम्पस इंटरव्हयूचे आयोजन करण्यात आले होते. कंपनीच्या गोवा येथील औषध प्रकल्पांसाठी या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या 25 विद्यार्थ्यांची तसेच यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या 14 विद्यार्थ्यांची यशस्वी निवड झाली. कंपनी गेली पाच वर्षे…

Read More

कळसुली येथे 13 मे पासून श्री स्वामी समर्थ मुर्ती स्थापना, कलशारोहण सोहळा

विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ⚡कणकवली ता.१०-: प्रेमदया प्रतिष्ठान (मुंबई) व श्री स्वामी समर्थ मठ कळसुली (हर्डी) यांच्या संयुक्त विद्यमाने कळसुली हर्डी येथे श्री स्वार्मी समर्थ महाराजांचे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरामध्ये 13 ते 15 मे या कालावधीत श्री स्वामींची मुर्ती स्थापना, कलशारोहण आणि पादुका पूजन सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक आणि…

Read More

साळिस्तेच्या खांबेश्वर विठ्ठलादेवी मंदिराचा जिर्णोध्दार सोहळा उत्साहात

⚡कणकवली ता.१०-: कणकवली तालुक्यातील साळिस्ते गावचे ग्रामदैवत श्री देव खांबेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार पुर्नप्रतिष्ठापना सोहळ्याला सोमवारी उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. सोमवारी सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात, देवतांच्या जयघोशात आणि भक्तिपुर्ण वातावरणात देवतांचे आगमन झाले. या मंदिराचा कलशारोहण सोहळा श्री मठ संस्थान दाभोली येथील श्रीमत दत्तानंद सरस्वती महाराज यांच्या शुभहस्ते 11मे रोजी संपन्न होणार आहे.  सोमवारी…

Read More

वेंगुल्र्यात रंगणार 13 रोजी युनिक कपल स्पर्धा

⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला तालुका गौड सारस्वत समाजातर्फे 13 मे रोजी सायंकाळी 6 वाजता भटवाडी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात सर्व जातीतील लोकांसाठी विवाहित दांपत्यांसाठी युनिक कपल 2023 या खुल्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.या स्पर्धेत विवाहितच दांपत्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. यात वयाचे बंधन नाही. स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यात रोख 15 हजार व मुकुट, द्वितीय क्रमांकास रोख…

Read More

प्रदिप प्रभू यांना सामाजिक कार्य पुरस्कार

⚡वेंगुर्ला ता.१०-: परुळे बाजार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य व सामाजिक कार्यकर्ते प्रदिप प्रभू यांना सन 2023 चा कामगार नेते डॉ. दत्ता सामंत सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. श्री. प्रभू हे सहकार आणि सामाजिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असून त्यांना यापूर्वी शासन शेती पुरस्कार प्राप्त झाला आहे. 2005 ते 2012 पर्यंत परुळे…

Read More

भाजप जिल्हाध्यक्ष बदलाची प्रक्रिया सुरू

१५ मे पर्यंत होणार निश्चिती: प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे आदेश;नूतन प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची माहिती ओरोस ता.१०-: भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा अध्यक्षपदासाठी १५ मे पर्यंत प्रक्रिया पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी कोल्हापूर येथील प्रदेश सरचिटणीस महेश जाधव यांची निवड केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात सध्या पक्षांतर्गत मत जाणून घेण्याचे काम सुरू…

Read More

शिक्षणमंत्री स्वतःच्या जिल्ह्यात सीटीईटी परीक्षेसाठीचे केंद्र सुरू करू शकतील का?

माजी आम.परशुराम उपरकर ; महाराष्ट्रातील केंद्रे फुल्ल झाल्याने विद्यार्थाची गैरसोय.. ⚡कणकवली ता.१०-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमदार व राज्याचे शिक्षण मंत्री असलेले दीपक केसरकर यांनी नुकतीच शिक्षक भरती होणार असल्याचे जाहीर केले. मात्र या शिक्षक भरतीसाठी होणाऱ्या सीटीईटी परीक्षेसाठी महाराष्ट्रातील केंद्रे फुल झाली असून उमेदवारांची मोठी गैरसोय होत आहे. शिक्षणमंत्री स्वतःच्या जिल्ह्यात या परीक्षेसाठीचे केंद्र सुरू करू…

Read More

माजगाव येथील डाॅमिनिक मोंतेरो यांचे निधन…

सावंतवाडीमाजगाव तांबळगोठण येथील डॉमिनिक सायमन मोंतेरो (७४) यांचे आज गोवा येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुली जावई नातवंडे असा परिवार आहे. सावंतवाडी बँक ऑफ महाराष्ट्राची निवृत्त कर्मचारी पॉली परेरा यांचे ते भाओजी तर मिलाग्रिस हायस्कूल च्या सौ. विल्मा टिचर यांचे ते वडील व क्रोज फर्नांडिस यांचे ते सासरे होत. उद्या गुरुवारी सायंकाळी…

Read More

कौशल्य विकास महामंडळाच्या अभ्यासक्रमाचे ११ रोजी उद्घाटन

बांदा/प्रतिनिधीकेंद्र सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाकडून मान्यता प्राप्त झालेल्या विविध अभ्यासक्रमांचे उद्घाटन गुरुवार दिनांक ११ मे रोजी गोगटे वाळके महाविद्यालयात होणार आहे. अकाउंट एक्झिक्युटिव्ह, मेकॅनिकल ड्रासमन, प्लंबिंग हे मोफत प्रशिक्षण वर्ग महाविद्यालयात सुरू करण्यात आले असून, या तिन्ही अभ्यासक्रमांना मिळून १८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या अभ्यासक्रमांचे उद्घाटन उद्या गुरुवारी होणार असून या उद्घाटन समारंभासाठी…

Read More
You cannot copy content of this page