कौशल्य विकास महामंडळाच्या अभ्यासक्रमाचे ११ रोजी उद्घाटन

बांदा/प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाकडून मान्यता प्राप्त झालेल्या विविध अभ्यासक्रमांचे उद्घाटन गुरुवार दिनांक ११ मे रोजी गोगटे वाळके महाविद्यालयात होणार आहे.


अकाउंट एक्झिक्युटिव्ह, मेकॅनिकल ड्रासमन, प्लंबिंग हे मोफत प्रशिक्षण वर्ग महाविद्यालयात सुरू करण्यात आले असून, या तिन्ही अभ्यासक्रमांना मिळून १८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या अभ्यासक्रमांचे उद्घाटन उद्या गुरुवारी होणार असून या उद्घाटन समारंभासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी, प्रवेशित विद्यार्थ्यांनी तसेच सर्व प्राध्यापकवर्गाने उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डी. बी. वारंग यांनी केले आहे.

You cannot copy content of this page