Headlines

श्री देव वेतोबा मालिकेचा प्रीमियर शो १७ रोजी सावंतवाडीत…

दररोज सायंकाळी ७ वाजता होणार प्रसारित:विनय नलावडे, आशिष पवार याची माहिती ⚡सावंतवाडी ता.१५-: १७ जुलै पासून “श्री देव वेतोबा” ही मालिका सन मराठी वाहिनीवर सायंकाळी ७ वाजता दररोज प्रसिद्ध होत आहे. यानिमित्त सावंतवाडी शहरातील मोती तलावाजवळ ३० फूट उंचीचे मोठे कट आऊट लावण्यात येणार आहे. त्याचा रसिकांनी लाभ घेत सेल्फी काढून सोशल मीडियावर प्रसार करावा….

Read More

दोडामार्ग येथे उद्या गुरुपौर्णिमा उत्सव

स्वरताल संगीत विद्यालय आणि राष्ट्रोळी मंडळाचे आयोजन ⚡दोडामार्ग,ता.१५-: येथील स्वरताल संगीत विद्यालय व श्री.राष्ट्रोळी कला, क्रीडा व ग्रामविकास मंडळ धाटवाडी, कसई-दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (ता.16) सायंकाळी ५ वाजता येथील महालक्ष्मी सभागृहात साजरी केली जाणार आहे. यावेळी फ. रा. प्रतिष्ठान्चे अध्यक्ष प्रेमानंद देसाई, नगरसेविका वासंती मयेकर अँड. सोनू गवस, हळबे महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष सावंत, दोडामार्ग…

Read More

हर्ष कासार शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम

जिल्ह्यात सव्वीसावा;दोडामार्ग इंग्लिश स्कूलचे उज्ज्वल यश ⚡दोडामार्ग,ता.१५-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत दोडामार्ग इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी हर्ष महेश कासार तालुक्यात प्रथम आला आहे.दोडामार्ग तालुक्यात शहरी सर्वसाधारण या प्रवर्गातून हर्ष तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात सव्वीसावा आला आहे. त्याला शिष्यवृत्ती परीक्षेत 204 गुण (68.00%) मिळाले आहेत.त्याला शाळेतील शिक्षक आणि आई…

Read More

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लात विविध कार्यक्रम…

⚡वेंगुर्ले ता.१५-: महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले शहर शिवसेनेतर्फे मंगळवार दि. 18 जुलै रोजी खुल्या हाँलीबाँल स्पर्धा, औषधी व सावली देणाऱ्या वनस्पतींची लागवड आणि श्री. केसरकर यांना दिर्घायुष्य व चांगले आरोग्य लाभावे यासाठी मंदिरात लघुरुद्र असे महत्त्वपुर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात दि. 18 जुलै रोजी…

Read More

तळेरे येथे १६ जुलै रोजी
जी.ए.कुलकर्णी “शताब्दी संस्मरण अभिवाचन” कार्यक्रम

⚡कणकवली ता.१५-:संवाद परिवार तळेरेच्या वतीने प्रसिध्द कथाकार जी.ए.कुलकर्णी यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त“शताब्दी संस्मरण अभिवाचन” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवार १६ जुलै २०२३ सायंकाळी ठीक ६.०० वाजता वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या डॉ. एम.डी.देसाई सांस्कृतिक भवन,तळेरे येथे करण्यात आले आहे. प्रसिध्द कथाकार जी.ए.कुलकर्णी यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त दर महिन्याला एक अभिवाचन कार्यक्रम (तीन कथा) सादर होणार आहे.प्रत्येक…

Read More

धोकादायक खड्डा ‘बांधकाम’ला दिसत नाही का?

वाहनचालकांचा प्रश्न; दोडामार्ग आयी मार्गावरील खड्डयामुळे अपघाताची भीती ⚡दोडामार्ग ,ता.१५-: दोडामार्ग आयी मार्गावरील बाजारपेठेतील धोकादायक खड्डा बांधकाम विभागाला दिसत नाही की दिसून ते न बघितल्यासारखे करताहेत असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत.विशेष म्हणजे त्या रस्त्याचे पहिल्या टप्प्यातील डांबरीकरण झाल्यावर भागू पटकारे यांच्या घरासमोरील रस्त्यात लगेचच तो खड्डा पडला होता; पण हमी कालावधी व काम अपूर्ण असूनही…

Read More

प्रवीण गवस यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार

⚡दोडामार्ग,ता.१५-: स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीयसमाजभूषण पुरस्कार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा तेरवण मेढे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रवीण गवस यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण रविवारी (ता. ३०) अहमदनगर येथील माऊली संकुल सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे.श्री. गवस यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

Read More

दोडामार्गात खुली शास्त्रीय गायन स्पर्धा

उदयोन्मुख गायकांना संधी देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन ⚡दोडामार्ग,ता.१५-: उदयोन्मुख कलाकारांना संधी देण्यासाठी तालुक्यात प्रथमच खुल्या शास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.जिव्हाळा क्रियेशन,बेनकर ज्वेलर्स दोडामार्ग, नाईक दशावातार नाट्य मंडळ झरेबांबर, स्वरताल संगीत विद्यालय दोडामार्ग, सिद्धेश्वर दशावातर नाटय मंडळ खोक्रल,शारदा संगीत विद्यालय साटेली,आणि संगीत साधना विद्यालय दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कलाकारांना स्वतंत्र…

Read More

कारीवडे पेडवेवाडीत सुमो पलटी होऊन अपघात

सकाळची घटना: सात प्रवासी किरकोळ जखमी ⚡सावंतवाडी ता.१५-: चालकाचा ताबा सुटल्याने सुमो पलटवून अपघात झालाय हा अपघात आज सकाळी कारीवडे- पेडवेवाडी येथे घडला असून यात सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान अचानक कुत्रा आडवा आल्याने चालकाने ब्रेक मारल्याने गाडी पलटी झाली. संबंधित कुटुंब एका साखरपुडा कार्यक्रमानिमित्त सावंतवाडीत आले. होते.

Read More

विरोधकांनाही सोबत घेऊन सिंधुदुर्गात राष्ट्रवादी मजबूत करणार…

अबिद नाईक:ज्यांच्यात क्रियाशिलताच नाही, त्यांच्याबाबत बोलणे योग्य नाही;नियुक्तीचा निर्णय सर्वसहमतीने ⚡कणकवली ता.१४-: विरोधकांनाही सोबत घेऊन सिंधुदुर्गात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठलेही गटातटाचे राजकारण होणार नाही.असे सांगतानाचराष्ट्रवादी पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल कुडाळ तटकरे यांनी माझी जिल्हाध्यक्षपदी व काका कुडाळकर यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. हा नियुक्तीचा निर्णय सर्वसहमतीने…

Read More
You cannot copy content of this page