⚡दोडामार्ग,ता.१५-: स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय
समाजभूषण पुरस्कार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा तेरवण मेढे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रवीण गवस यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण रविवारी (ता. ३०) अहमदनगर येथील माऊली संकुल सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे.श्री. गवस यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
प्रवीण गवस यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार
