Headlines

हर्ष कासार शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम

जिल्ह्यात सव्वीसावा;दोडामार्ग इंग्लिश स्कूलचे उज्ज्वल यश

⚡दोडामार्ग,ता.१५-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत दोडामार्ग इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी हर्ष महेश कासार तालुक्यात प्रथम आला आहे.
दोडामार्ग तालुक्यात शहरी सर्वसाधारण या प्रवर्गातून हर्ष तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात सव्वीसावा आला आहे. त्याला शिष्यवृत्ती परीक्षेत 204 गुण (68.00%) मिळाले आहेत.त्याला शाळेतील शिक्षक आणि आई सुमन कासार व वडील महेश कासार यांनी मार्गदर्शन केले.
त्याच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष विकास सावंत, खजिनदार सी. एल. नाईक, सचिव व्ही. बी.नाईक, मुख्याध्यापक शैलेश नाईक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page