दररोज सायंकाळी ७ वाजता होणार प्रसारित:विनय नलावडे, आशिष पवार याची माहिती
⚡सावंतवाडी ता.१५-: १७ जुलै पासून “श्री देव वेतोबा” ही मालिका सन मराठी वाहिनीवर सायंकाळी ७ वाजता दररोज प्रसिद्ध होत आहे. यानिमित्त सावंतवाडी शहरातील मोती तलावाजवळ ३० फूट उंचीचे मोठे कट आऊट लावण्यात येणार आहे. त्याचा रसिकांनी लाभ घेत सेल्फी काढून सोशल मीडियावर प्रसार करावा. यादिवशी सायंकाळी ५ वाजता आरती करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता एस टी स्टँड नजीक असलेल्या वैश्य भवन येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. ७ वाजता मालिकेचा पहिला भाग येथे प्रीमियर शो म्हणून प्रसारित केला जाणार आहे.
सावंतवाडीतील रसिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. यावेळी मालिकेतील कलाकार यावेळी उपस्थित राहणार असल्याने त्यांच्याशी गप्पा सुद्धा मारता येणार आहेत, अशी माहिती मालिकेचे विनय नलावडे, आशिष पवार यांनी दिली आहे.
