Headlines

पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा निमंत्रकपदी लक्ष्मीकांत भावे

समन्वयक पदाची जबाबदारी कुडाळचे पत्रकार गुरूप्रसाद वामन दळवी ⚡कणकवली ता.१९-: पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा निमंत्रक म्हणून कणकवलीचे पत्रकार लक्ष्मीकांत मनोहर भावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. समन्वयक पदाची जबाबदारी कुडाळचे पत्रकार गुरूप्रसाद वामन दळवी यांच्याकडे सोपविण्यात आली असल्याची माहिती राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी दिली.राज्यात पत्रकारांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले असून हल्ल्याबाबत कृती समिती…

Read More

खा विनायक राऊत शिवसेनेला कलंक होते

मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना वाचाविल्याने राऊत झाले बेरोजगार:शिवसेनेचे जिल्हा सचिव किसन मांजरेकर यांचा आरोप. ⚡ओरोस ता.१९-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मातोश्री वर माफी मागायला येतील अशी मुक्ताफळे खासदार विनायक राऊत यांनी उधळी आहेत विनायक राऊत शिवसेनेला कलंक होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाने शिवसेना वाचली आणि विनायक राऊत हे बेरोजगार झाले आहेत शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव…

Read More

आडाळी ग्रामस्थानी पुकारलेल्या लॉंग मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा…

अर्चना घारे-परब; सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होणार…_ ⚡सावंतवाडी ता.१९-: आडाळी येथील एमआयडीसीचे काम मार्गी लागावे. यासाठी स्थानिकांनी ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनाला सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे.या पार्श्वभूमीवर लॉंग मार्च २० तारखेला काढण्यात येणा-या लॉंग मार्च मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी दिली.

Read More

उधाणामुळे होडी उलटून तीन मच्छीमार समुद्रात अडकले

आचरा पिरावाडी येथील दुर्घटना:स्थानिक मच्छीमारांनी सुखरूप काढले बाहेर मालवण दि प्रतिनिधी शनिवारी पहाटे मासेमारी साठी म्हणून पूजा पात घेऊन गेलेले आचरा पिरावाडी येथील तीन मच्छिमारांची जाळी समुद्राला आलेल्या उधाणामुळे होडीच्या पंख्याला अडकून झालेल्या दुर्घटनेत तीन मच्छिमार पाती बाहेर फेकले गेले. समुद्राच्या खडकाच्या आधाराला राहिलेल्या मच्छिमारांना पिरावाडी येथील मच्छिमारांनी धाव घेत सुखरूप वाचवले आचरा समुद्रात शनिवारी…

Read More

वसुंधा वंदन उपक्रमांतर्गत कणकवली पं.स.च्या परिसरात वृक्षारोपण

⚡कणकवली ता.१८-: स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी समारोपांतर्गत देशभर ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हे अभियान राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत असलेल्या वसुंधा वंदन उपक्रमांतर्गत कणकवली पंचायत समितीच्या परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण करत त्या रोपांच्या संवर्धन व संगोपणाची जबाबदारी घेतली. ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या अभियानांतर्गत कणकवली पंचायत समितीच्या आवारात गुरुवारी सकाळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी…

Read More

कणकवलीत २० ऑगस्ट रोजी कै. निवृत्ती दाभोळे स्मृती संगीत समारोह

⚡कणकवली ता.१९-:संगीततज्ञ कै. निवृत्ती दाभोळे यांनी कणकवलीत राहून अनेक वर्ष संगीत सेवा केली, अनेक गुणी शिष्यांना संगीत मार्गदर्शन केले. त्यासोबतच त्यांचा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक माणसांशी स्नेह जोडला गेला होता. म्हणूनच त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा व सिंधुदुर्गतील कलावंतांना दर्जेदार मंच मिळावा या भावनेतून गेले ५ वर्ष हा स्मृती संगीत सोहळा गंधर्व व दाभोळे शिष्य परिवार…

Read More

आर्थिक मागास प्रवर्गातील ३७६ शिक्षक पदे रिक्त…

संभाव्य भरतीत एकूण पदांच्या १० टक्के जागा मिळण्याची शक्यता: मराठा, मुस्लिम, ख्रिश्चनांनी आवाज उठविण्याची गरज;कुडाळ युवा सेना प्रमुख योगेश धुरी यांचे आवाहन कुडाळ, प्रतिनिधी-:सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उपशिक्षक प्राथमिक विभागांमध्ये एकूण ३ हजार ७८५ पदे मंजूर आहेत. यापैकी अनुसूचित जातीचे ३२७, अनुसूचित जमातीचे ५१ पदे, विमुक्त जातीचे ५१ पदे, भटक्या जमातीचे ९५ पदे भरलेली आहेत. भटक्या जमाती…

Read More

सांगुळवाडीच्या कृषी कन्यांनी भरविले रानभाज्या प्रदर्शन

शेतकरी, विद्यार्थी, शिक्षकांनी घेतला सहभाग वैभववाडी प्रतिनिधीडॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली सलग्न कृषी महाविद्यालय सांगुळवाडीच्या कृषीशक्ती ग्रुपच्या कन्यानी सांगुळवाडी गावात रानभाज्या प्रदर्शन व 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी विहीर स्पर्धेचे आयोजन केले होते. या प्रदर्शनामध्ये गावातील शेतकऱ्यांनी व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता तर विविध स्पर्धेमध्ये पूर्व प्राथमिक शाळा सागुळवाडीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला…

Read More

क्षेत्रफळ मधील राखीव जंगलात खैरतोड करणाऱ्या आरोपींना वन विभागाने केली अटक…

तीन आरोपींपैकी एक ताब्यात दोन फरार ⚡सावंतवाडी ता.१८-: क्षेत्रफळ मधील वन विभागाच्या राखीव जंगलात असलेली खैराची झाडे तोड करत असलेल्या तीन आरोपींवर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी झडप घालून एका आरोपीला ताब्यात घेतले तर दोन आरोपी घटनास्थळावरून चकमा देऊन फरार झाले. अटक केलेल्या आरोपीचे नाव लवू एकनाथ गावडे, रा.वेत्ये असून फरार झालेल्या आरोपींची नावे संदीप रामा गावडे…

Read More

रेवंडी येथे मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रम…

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजन मालवण दि प्रतिनिधीभारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या समारोपीय वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या मेरी मिट्टी मेरा देश या अभियाना अंतर्गत मालवण तालुक्यातील रेवंडी ग्रामपंचायत येथे विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी सरपंच अमोल वस्त यांच्या हस्ते स्वातंत्र्यावीरांच्या स्मृतीना उजाळा देणाऱ्या शिलाफलकाचे अनावरण तसेच ध्वजरोहण करण्यात आले. तसेच हातात मातीचे दिवे घेऊन पंचप्रण शपथ घेण्यात आली. यानिमित्त…

Read More
You cannot copy content of this page