स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजन
मालवण दि प्रतिनिधी
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या समारोपीय वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या मेरी मिट्टी मेरा देश या अभियाना अंतर्गत मालवण तालुक्यातील रेवंडी ग्रामपंचायत येथे विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी सरपंच अमोल वस्त यांच्या हस्ते स्वातंत्र्यावीरांच्या स्मृतीना उजाळा देणाऱ्या शिलाफलकाचे अनावरण तसेच ध्वजरोहण करण्यात आले. तसेच हातात मातीचे दिवे घेऊन पंचप्रण शपथ घेण्यात आली.
यानिमित्त रेवंडी ग्रामपंचायती तर्फे गावातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील वृंदा तुळशीदास धुळे व कांबळी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत गावातून मूठ माती तालुकास्तरावर देण्यात आली. जीवन शिक्षण विद्यामंदिर रेवंडी वरची येथे वृक्षारोपण जरण्यात आले. तसेच ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत गावात झेंडे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच अमोल वस्त, उपसरपंच श्रद्धा वेंगुर्लेकर, ग्रा. पं. सदस्य प्राजक्ता कांबळी, प्रिया कांबळी, नेहा कांबळी, संतोष कांबळी, ग्रामसेवक साक्षी पिंगुळकर- चेंदवणकर, मुख्याध्यापक गौरी केणी, अंगणवाडी सेविका साधना पराडकर, रिया कांबळी, आशा सेविका समीरा कांबळी, शिपाई समीर कांबळी, कर्मचारी शर्विन कांबळी, मदतनीस निकिता तळाशीलकर, अस्मिता कांबळी, ग्रामस्थ नरेश करलकर, तंटामुक्ती अध्यक्ष विजय कांबळी, विकास चेंदवणकर, शामसुंदर तळाशीलकर आदी व इतर उपस्थित होते.
