शेतकरी, विद्यार्थी, शिक्षकांनी घेतला सहभाग
वैभववाडी प्रतिनिधी
डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली सलग्न कृषी महाविद्यालय सांगुळवाडीच्या कृषीशक्ती ग्रुपच्या कन्यानी सांगुळवाडी गावात रानभाज्या प्रदर्शन व 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी विहीर स्पर्धेचे आयोजन केले होते.
या प्रदर्शनामध्ये गावातील शेतकऱ्यांनी व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता तर विविध स्पर्धेमध्ये पूर्व प्राथमिक शाळा सागुळवाडीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी सरपंच सौ रावराणे, ग्रामपंचायत सदस्य सत्यवान सुतार, गौरी रावराणे, सौ भोवड, ग्रामसेवक विद्याधर सावंत, प्राथमिक शिक्षक समीर सरवणकर, परब, शेटे ,अंगणवाडी सेविका सौ भोवड,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी कन्या भाग्यश्री पाटील विद्यार्थिनी प्रतिनिधी, अमृता पाटील, समृद्धी पाटील, नम्रता कावरे, रुचिता गवस, वैष्णवी वाडेकर, शितल शेडगे, मैथिली जाधव, आदींनी परिश्रम घेतले.
