खा विनायक राऊत शिवसेनेला कलंक होते

मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना वाचाविल्याने राऊत झाले बेरोजगार:शिवसेनेचे जिल्हा सचिव किसन मांजरेकर यांचा आरोप.

⚡ओरोस ता.१९-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मातोश्री वर माफी मागायला येतील अशी मुक्ताफळे खासदार विनायक राऊत यांनी उधळी आहेत विनायक राऊत शिवसेनेला कलंक होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाने शिवसेना वाचली आणि विनायक राऊत हे बेरोजगार झाले आहेत शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव किसन मांजरेकर यांनी लगावला आहे.

मांजरेकर पुढे म्हणाले मातोश्री वरची उरली सुरली वसुलीची कामे तरी आपल्याला मिळावे यासाठी त्यांची ही उद्धव ठाकरे यांची भाटगिरी चालली आहे जिल्ह्यात एकही प्रकल्प आणता आला नाही फक्त भाजपाच्या केंद्रातील कामाचे श्रेय घ्यायला राऊतधडपडतात आयुष्यभर विमानतळा विरोध करणारे विनायक राऊत उद्घाटनाला मात्र घरचे बारसे असल्यासारखे नारायण राणेंना पेढे वाटण्याइतके कोडगे आहेत हे सिंधुदुर्ग जिल्ह्याने पाहिले आहे उद्धव ठाकरेंना दिवा स्वप्नात रंगवून ठेवण्याचे आणि आपल्याला स्वार्थ साधायचा असल्या विनायक राऊत स्टाईल सोनसाखळी स्वार्थीपणामुळे मातोश्री ची वाट लागली आहे एकनाथ शिंदे हे आजही मुख्यमंत्री आहेत हे राऊत विसरत आहेत ते यापुढे माफी मागायला नव्हे तर तुमच्यासारख्या खासदारकीला शेवटचे कुलूप लावायला येतील हे रावत आणि लक्षात ठेवावे यापुढे त्यांनी शिंदे यांच्या राजकारणावर बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा जळगावच्या भजनी डबलबारी कडे काय तो लक्ष द्यावा उर्वरित आयुष्य तरी भजनात कंठावे असे प्रत्युत्तर शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव किसन मांजरेकर यांनी दिले आहे सोबत फोटो

You cannot copy content of this page