Headlines

वीज ग्राहक सावंतवाडी संघटनेच्या अध्यक्षपदी संजय लाड…

⚡सावंतवाडी ता.२०-: येथील तालुका वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्षपदी संजय लाड तर सचिव पदी संजय नाईक यांची नियुक्ती करण्यात आली. वीज ग्राहक संघटनेचा जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच सावंतवाडी येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट यांच्या उपस्थितीत पार पडली.

Read More

प्रसिद्ध एम एफ सी कॅफेचे सावंतवाडीत राजन तेलींच्या हस्ते उद्घाटन…

जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदवळे यांची उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.१९-:गोव्याससह मोठ्या शहरात प्रसिद्ध असलेल्या एम एफ सी कॅफे सावंतवाडी येथील रामेश्वर प्लाझात आजपासून सुरू झाला आहे. त्याचे उद्घाटन आज सकाळी माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या उपस्थितीत उद्घाटन…

Read More

कर्ज देणे – घेण्याच्या पलीकडे जिल्हा बँक काम करीत आहे

बांदा येथे अध्यक्ष मनीष दळवी यांचे प्रतिपादन:दुग्ध व्यावसायिक संस्थांनी आयोजित केला होता कार्यक्रम सावंतवाडी(प्रतिनिधी) कर्ज देणे आणि कर्जाची वसुली करणे एवढ्या पुरतीच बँकिंग कामकाजाची व्याप्ती न मानता सामाजिक जाणवेपोटी जिल्हा बँक दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी प्रशिक्षण, व्यावसायिक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करीत असुन शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचं काम जिल्हा बँक सातत्याने करीत असल्याचे…

Read More

विलवडेतील युवकाचा पुण्याजवळ अपघाती निधन

बांदा :  विलवडे (ता. सावंतवाडी ) ग्रामोन्नती मंडळाचे सक्रिय सदस्य गजानन कृष्णा दळवी (४५ , विलवडे-वरचीवाडी, सध्या रा. बोरीवली-मुंबई) यांचे अपघाती  निधन झाले. पुणे (भिमा शंकर, शिडी घाट येथे आपल्या कुटुंबिय व सहकारी मित्रासोबत शनिवारी सकाळी ट्रँकींगला गेले होते. सायंकाळी शिडीघाट चढत असताना पाय घसरून १०० फुट दरीत पडल्याने अपघाती मृत्यु झाल्याचे त्यांच्या सोबत असलेल्या मित्र‍ाकडून…

Read More

गोळवण चव्हाणवाडी येथे स्मशान शेडचे लोकार्पण

⚡मालवण ता.१९-: भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून व भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजूर केलेल्या मालवण तालुक्यातील गोळवण चव्हाणवाडी येथील स्मशान शेडचे लोकार्पण नाभिक समाजाचे राज्य संघटक विजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या लोकार्पण प्रसंगी सरपंच श्री. सुभाष लाड, ग्रामपंचायत सदस्य श्री. शरद मांजरेकर,…

Read More

मोकाट गुरांच्या समस्येप्रश्नी कमलाकर खोत यांचा पुन्हा उपोषणाचा इशारा

⚡मालवण ता.१९-:मालवण शहरात मोकाट गुरांपासून होणाऱ्या त्रासाबाबत लक्ष वेधूनही अपेक्षित न्याय मिळत नसल्याने तसेच मोकाट गुरे सोडणाऱ्या मालकांवर मालवण नगरपालिकेकडून कारवाई होत नसल्याने मालवण धुरीवाडा येथील ज्येष्ठ नागरिक कमलाकर खोत यांनी पुन्हा एकदा दि. २५ ऑगस्ट रोजी मालवण नगरपालिकेसमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. मालवण धुरीवाडा येथे मोकाट गुरांपासून होणाऱ्या त्रासाबाबत ज्येष्ठ नागरिक…

Read More

आडाळी एमआयडीसीमध्ये येत्या काही दिवसात चांगले प्रकल्प आलेले दिसतील…

उद्योगमंत्री उदय सामंत:मित्रपक्षांच्या लोकांनी माझ्याशी संपर्क साधला असता तर त्यांचा गैरसमज दूर झाला असता.. ⚡ओरोस ता.१९-: आडाळी एमआयडीसीमध्ये येत्या काही दिवसात चांगले प्रकल्प आलेले दिसतील त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत मात्र २१० कोटी रुपयाचा प्रोजेक्ट लवकरच येते सुरु होत आहे. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी २२ कोटी दिले तर तेथे पाण्यासाठी पाच कोटी रुपये देतोय त्यामुळे एमआयडीसीचे काम कोठेही…

Read More

मालवण भंडारी हायस्कूलच्या पार्थ मेस्त्रीच्या कलाकृतीची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद

⚡मालवण ता.१९-: आषाढी एकादशी निमित्त तुळशीच्या पानावर अवघ्या १८ मिनिटात रांगोळीतून श्री विठ्ठलाची आकर्षक प्रतिमा साकारणाऱ्या मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमधील इयत्ता दहावीचा विद्यार्थी कु. पार्थ साईनाथ मेस्त्री याच्या या कामगिरीची दखल आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ने घेऊन सर्वात जलद गतीने तुळशीच्या पानावर रांगोळी साकारल्या बद्दल पार्थ मेस्त्रीच्या कलाकृतीची नोंद केली आहे. लहान वयातच…

Read More

सिंधुदूर्गची जबाबदारी ना. हसन मुश्रीफ यांच्यावर…

सिंधुदुर्गात राष्ट्रवादी बळकट करणार कणकवली 19 ऑगस्ट (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राज्यात नव्याने संघटनात्मक बांधणी केली जात आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह राज्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये पक्ष आणि संघटनवाढीची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये सिंधुदूर्ग जिल्ह्याची जबाबदारी ना. हसन मुश्रीफ यांच्यावर सोपविण्यात आली आहे . ना. हसन…

Read More

राष्ट्रसेविका समितीतर्फे 20 रोजी कणकवली येथे कथावाचन कार्यक्रम

⚡कणकवली ता.१९-: आनंदी शाखा कणकवली तर्फे रविवार 20 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 वाजता ‘ऐलमा पैलमा, अक्षर देवा’ या सिंधुदुर्गातील महिला साहित्यिक समुहातील कथालेखिकांच्या कथावाचनाचा कार्यक्रम दुपारी ३ वाजता वृंदावन हॉल,महाजनी नगर (जानवली पुलाजवळ ) येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्वांनी या कथावाचनाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून कथावाचनाचा आनंद घ्यावा व साहित्यिकांना दाद द्यावी…

Read More
You cannot copy content of this page