गोळवण चव्हाणवाडी येथे स्मशान शेडचे लोकार्पण

⚡मालवण ता.१९-: भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून व भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजूर केलेल्या मालवण तालुक्यातील गोळवण चव्हाणवाडी येथील स्मशान शेडचे लोकार्पण नाभिक समाजाचे राज्य संघटक विजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

या लोकार्पण प्रसंगी सरपंच श्री. सुभाष लाड, ग्रामपंचायत सदस्य श्री. शरद मांजरेकर, मेघा गावडे, बूथ प्रमुख श्री. भाई चिरमुले, आदर्श गाव सस्था प्रमुख श्री. मंगेश सावंत, नंदू नाईक, रमेश परब, संतोष चव्हाण, संदेश पवार, तसेच वाडीतील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page