मोकाट गुरांच्या समस्येप्रश्नी कमलाकर खोत यांचा पुन्हा उपोषणाचा इशारा

⚡मालवण ता.१९-:
मालवण शहरात मोकाट गुरांपासून होणाऱ्या त्रासाबाबत लक्ष वेधूनही अपेक्षित न्याय मिळत नसल्याने तसेच मोकाट गुरे सोडणाऱ्या मालकांवर मालवण नगरपालिकेकडून कारवाई होत नसल्याने मालवण धुरीवाडा येथील ज्येष्ठ नागरिक कमलाकर खोत यांनी पुन्हा एकदा दि. २५ ऑगस्ट रोजी मालवण नगरपालिकेसमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

मालवण धुरीवाडा येथे मोकाट गुरांपासून होणाऱ्या त्रासाबाबत ज्येष्ठ नागरिक कमलाकर खोत यांनी मालवण नगरपालिका प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार केली. मात्र तक्रारीची कोणतीही दखल घेतली न गेल्याने कमलाकर खोत यांनी १५ ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, १५ रोजी मालवण पोलिसांच्या आवाहनानंतर खोत यांनी उपोषण स्थगित केले होते. तसेच मुख्याधिकाऱ्यांनी या प्रश्नी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे खोत यांनी सांगितले. मात्र, संबंधित मोकाट गुरांच्या मालकांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने कमलाकर खोत यांनी २५ ऑगस्ट रोजी नगरपालिकेसमोर पून्हा उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

You cannot copy content of this page