विलवडेतील युवकाचा पुण्याजवळ अपघाती निधन

बांदा :  विलवडे (ता. सावंतवाडी ) ग्रामोन्नती मंडळाचे सक्रिय सदस्य गजानन कृष्णा दळवी (४५ , विलवडे-वरचीवाडी, सध्या रा. बोरीवली-मुंबई) यांचे अपघाती  निधन झाले. पुणे (भिमा शंकर, शिडी घाट येथे आपल्या कुटुंबिय व सहकारी मित्रासोबत शनिवारी सकाळी ट्रँकींगला गेले होते. सायंकाळी शिडीघाट चढत असताना पाय घसरून १०० फुट दरीत पडल्याने अपघाती मृत्यु झाल्याचे त्यांच्या सोबत असलेल्या मित्र‍ाकडून सांगण्यात आले.

मुंबई येथील मंडळाच्य‍ा १५ आँगस्ट  रोजी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी सहभाग घेतला होता व नवीन इमारत बांधकामाच्या योजनेत मोलाचे मार्गदर्शन केले होते. संस्थेच्या वाटचालीत व सर्व व्यवस्थापनात त्यांचा प्रामाणिक व सक्रिय सहभाग होता. स्नेहसंमेलन आयोजन, नवीन इमारत बांधकाम, शाळेचे ऍसेट सत्यापन, कॉम्पुटर लॅबची व्यवस्था इत्यादीच्या व्यवस्थापनात त्यांचे भरीव योगदान होते. त्यांचे हे योगदान संस्थेच्या व कार्यकारिणीच्या वाटचालीत नेहमीच प्रेरणादायी व स्मरणात राहील. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबियांचे व संस्थेचे विलवडे गावाचे  मोठे नुकसान झाले.त्यांच्य‍ा पश्चात आई, पत्नी, भाऊ,मुलगा,मुलगा असा परिवार आहे.

You cannot copy content of this page