सिंधुदूर्गची जबाबदारी ना. हसन मुश्रीफ यांच्यावर…

सिंधुदुर्गात राष्ट्रवादी बळकट करणार

कणकवली 19 ऑगस्ट (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राज्यात नव्याने संघटनात्मक बांधणी केली जात आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह राज्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये पक्ष आणि संघटनवाढीची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये सिंधुदूर्ग जिल्ह्याची जबाबदारी ना. हसन मुश्रीफ यांच्यावर सोपविण्यात आली आहे .

ना. हसन मुश्रीफ यांच्यावर सिंधुदूर्गसह अहमदनगर,
कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नाम. हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गात राष्ट्रवादी संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी दिली.

You cannot copy content of this page