वेंगुर्ल्याच्या सुकन्येची स्पेन येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड…
⚡वेंगुर्ला ता.०६-: वेंगुर्ल्याची सुकन्या कु. नेहा महेंद्र आरोलकर हिची जागतिक बँक आणि भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत स्पेन येथील विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली असून ८ नोव्हेंबर रोजी ती स्पेन येथे जाण्यासाठी रवाना होणार आहे.
