शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान : सलग दोन तास पडला अवकाळी पाऊस
⚡बांदा ता.०६-: मडुरा पंचक्रोशीत सोमवारी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस सुरू झाला. वाळत टाकलेले भात पाण्यात तरंगू लागले. सलग दोन तास पाऊस कोसळल्याने शेतकऱ्याचे न भरून येणारे नुकसान झाले. दिवाळी सण तोंडावर असताना तीन महिने केलेली मेहनत अवकाळी पावसामुळे वाया गेल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आले.
