Headlines

महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे १४ रोजी जिल्ह्यात…

कणकवली येथील महायुतीच्या मेळाव्यात राहणार उपस्थित.. ⚡कणकवली ता.१२-: राज्याच्या महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे 14 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. कणकवली येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्यात त्या उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Read More

स्वक्षमता ओळखून करिअरची निवड केल्यास यश निश्चित मिळेल…

प्रा. रुपेश पाटील:चौकुळ येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व्याख्यान संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी प्रचंड बुद्धिमान आहेत. आपला माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल राज्यात सर्वोत्तम आहे. मात्र असे असतानाही विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे यश समाधानकारक नाही. याचे मुख्य कारण म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतांची जाणीव असतानाही ते करिअर निवडताना घोडचूक करतात,…

Read More

तातडीने पंचनामे करा आणि त्वरित भरपाई द्या…

संदेश पारकर: गेल्यावर्षी आंब्याचे अपेक्षित उत्पादन झाले नाही… ⚡कणकवली ता.१२-: ८ जानेवारी रोजी देवगड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्य़ात पडलेल्या तुफान पावसामुळे संपूर्ण जिल्ह्य़ातील आंबा बागायतदार हवालदिल झाला आहे. या पावसाचा आंबा मोहोरावर आणि अंतिमतः आंबा पिकावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहेत. म्हणून कालच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि…

Read More

एकांकिका स्पर्धांमधून उत्कृष्ट कलाकार निर्माण होतील…

रमाकांत खलप: वाड्यावाड्यांतील भाषांच्या रूपाचे आपण एकत्रिकरण केले तर एक सांस्कृतिक धन निर्माण होईल… वेंगुर्ला ता.१२-: मी कलाकार आहे अशी उर्मी देणारा प्रदेश म्हणजे कोकण. नाट्य रंगमंचाने माणसाला तगवल आहे. माणसाला जगविण्याची ताकद रंगमंच देतो. एकांकिका स्पर्धांमधून उत्कृष्ट कलाकार निर्माण होतील. ‘कलावलय‘ सातत्याने २७ वर्षे घेत असलेल्या या नाट्य चळवळीबद्दल त्यांचे कौतुक करतो. अशा एकांकिकांमधून…

Read More

मालवण नगरपरिषद रचना सहायक रिक्त पदी अखेर अधिकारी नियुक्ती…

माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या मागणीला यश… ⚡मालवण ता.१२-: मालवण नगरपरिषद रचना सहायक रिक्त पदी राजस अरुण कुणकवळेकर यांची नियुक्ती राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. मालवण नगरपरिषदेमधील रचना सहायक हे पद गेले अनेक महिने रिक्त होते. कामकाजावर त्याचा परिणाम होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. तरी रचना सहाय्यक हे पद तात्काळ भरून मिळावे….

Read More

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये युवा दिन साजरा…

⚡सावंतवाडी ता.१२-: स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘ माझी शाळा स्वच्छ शाळा’ या अभियानांतर्गत ‘ युवा दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये ‘ स्वामी विवेकानंद’ आणि ‘ राजमाता जिजाऊ’ यांची जयंती साजरी करण्यात आली. इयत्ता ५ वी मधील अगस्त्य तानपुरे या विद्यार्थ्याने स्वामी विवेकानंद यांच्याविषयी अभिनय नाट्याद्वारे माहिती सादर केली. तर शालेय सहा. शिक्षिका सौ. ग्रिष्मा…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा स्टॅण्ड येथे न.पं. जेष्ठ कर्मचारी यांचा गौरव…

⚡कणकवली ता.१२-: कणकवली बस स्थानका समोरील “छत्रपती शिवाजी महाराज” रिक्षा स्टॅण्ड येथे नगरपंचायतचे जेष्ठ कर्मचारी किशोर धुमाळे यांना गौरवण्यात आले, माऊली मित्र मंडळ व संलग्न जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळाच्यावतीने नुरूभाई, जमिल, कुरैशी, सईद नाईक ,हेमंत नाडकर्णी यांच्या उपस्थितीत सचिन कुवळेकर यांच्या हस्ते किशोर धुमाळे यांना शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले,यावेळी छत्रपती शिवाजी…

Read More

बुराण गल्ली बाहेरचा वाडा येथील गुलजार खान कुटुंबियांकडून सौ नीलिमा परशुराम चलवाडी यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१२-: शहरातील बुराण गल्ली बाहेरचा वाडा येथील गुलजार खान यांच्या मातीच्या घराला सिमेंटचा गिलावा करून कोसळणारी घराची भिंत वाचवल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि शिंदे शिवसेना गटाच्या पदाधिकारी सौ नीलिमा परशुराम चलवाडी यांचा खान कुटुंबीयांनी सत्कार केला. गेल्या दोन वर्षांपासून सतत पाऊस भिंतीवर कोसळत असल्याने धोकादायक बनलेल्या खान यांच्या घराच्या मातीच्या भिंतीला सिमेंट प्लास्टर करून परशुराम…

Read More

किक बॉक्सिंग स्पर्धेत देशाच प्रतिनिधित्व करणाऱ्या रुतिक सावंतला मनसे कडून आर्थिक मदत…

⚡सावंतवाडी ता.१२-: किक बॉक्सिंग या क्रिडा प्रकारात राज्य व देश पातळीवर अनेक पदक जिंकणाऱ्या तसेच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ओवळीये गावच्या रुतिक सावंत या तरुणास मनसे मार्फत आर्थिक मदत करण्यात आली असून या क्रिडा प्रकारात भविष्यात देशाला मोठे यश मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे या तरुण क्रीडापटूंने सांगितले आहे. या…

Read More

१४ जानेवारी रोजी कणकवली येथे गिरणी कामगारांचा भव्य मेळावा…

⚡मालवण ता.१२-: गिरणी कामगार व वारसदार न्याय हक्क संघटनेच्या वतीने गिरणी कामगार घरकुल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कोणताही भूमिपुत्र वंचित राहू नये यासाठी दि. १४ जानेवारी रोजी दु. ३ वा. प्रहार सभागृह कणकवली येथे भव्य गिरणी कामगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास सहनियंत्रक कमिटी म्हाडा चे सुनील राणे व आयोजक आम. नितेश राणे हे उपस्थिती…

Read More
You cannot copy content of this page