बुराण गल्ली बाहेरचा वाडा येथील गुलजार खान कुटुंबियांकडून सौ नीलिमा परशुराम चलवाडी यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१२-: शहरातील बुराण गल्ली बाहेरचा वाडा येथील गुलजार खान यांच्या मातीच्या घराला सिमेंटचा गिलावा करून कोसळणारी घराची भिंत वाचवल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि शिंदे शिवसेना गटाच्या पदाधिकारी सौ नीलिमा परशुराम चलवाडी यांचा खान कुटुंबीयांनी सत्कार केला.


गेल्या दोन वर्षांपासून सतत पाऊस भिंतीवर कोसळत असल्याने धोकादायक बनलेल्या खान यांच्या घराच्या मातीच्या भिंतीला सिमेंट प्लास्टर करून परशुराम चलवाडी यांनी स्वखर्चाने दिल्याबद्दल चलवाडी कुटुंबीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमास घर मालक
गुलजार खान तसेच जबीर बेग,सोहेल गोकाक,सादिया खान,रेशमा खान,सफिया खान,समरीन खान,जुबेदा खान,
यांच्यासह सौ नीलिमा चलवाडी सौ भारती परब सुप्रिया धारणकर सीमा सोनटक्के आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page