स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये युवा दिन साजरा…

⚡सावंतवाडी ता.१२-: स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘ माझी शाळा स्वच्छ शाळा’ या अभियानांतर्गत ‘ युवा दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये ‘ स्वामी विवेकानंद’ आणि ‘ राजमाता जिजाऊ’ यांची जयंती साजरी करण्यात आली. इयत्ता ५ वी मधील अगस्त्य तानपुरे या विद्यार्थ्याने स्वामी विवेकानंद यांच्याविषयी अभिनय नाट्याद्वारे माहिती सादर केली. तर शालेय सहा. शिक्षिका सौ. ग्रिष्मा सावंत यांनी विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माहिती सांगितली व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच या अभियनांतर्गत शाळेत स्वच्छता प्रकल्प राबविण्यात आला.

शाळेतील प्रत्येक वर्ग व शालेय परिसर विद्यार्थ्यांच्या सहाय्याने स्वच्छ करण्यात आला. शासनाने जाहीर केलेल्या या अभियानाद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता जागृत व्हावी, तसेच शासन निर्णयातील उद्दिष्टांची पूर्तता होण्याकरिता वरील उपक्रमांची अंमलबजावणी शाळेत करण्यात आली. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. वरील कार्यक्रमांचे मार्गदर्शन शाळेच्या समन्वयक सौ. सुषमा पालव यांनी केले. त्याचप्रमाणे शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांना पुढील उपक्रमांसाठी प्रोत्साहन दिले. अशाप्रकारे, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘ युवा दिन’ मोठ्या उत्साहात यशस्वीरीत्या साजरा करण्यात आला.

You cannot copy content of this page