ज्येष्ठ नागरिकांचा संघाचा मेळावा संपन्न…
⚡वेंगुर्ला ता.२७-: ज्येष्ठ नागरिक संघ वेंगुर्ला या संस्थेचा वार्षिक स्नेहमेळावा ११ फेब्रुवारी रोजी साई मंगल कार्यालयात संपन्न झाला. आयुष्य फार सुंदर आहे. ते आनंदाने जगा. अध्यात्मक आनंद सुचविते. आपल्या दुःखाचे कारण आपला अहंकार असून तो सोडून परमार्थाकडे वळा असे आवाहन प्रमुख पाहुणे बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांनी केले.
