जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या त्रिसूत्रीने यश मिळवा…
प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर:कुडाळात राज्यस्तरीय घोषवाक्य स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा.. ⚡कुडाळ ता.०१-: स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी आव्हाने स्वीकारून आत्मविश्वासाने वाटचाल करावी. जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल केल्यास निश्चितच यश संपादन करता येते, असे प्रतिपादन कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी केले.दत्ताविष्कार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग, आरंभ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आणि आस्था फाऊंडेशन, कुडाळ यांच्या संयुक्त…
