वेंगुर्ला तालुक्यात ठाकरे शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा…

⚡वेंगुर्ला ता.३०-: तालुक्यातील 5 जिल्हा परिषद मतदारसंघ व 9 पंचायत समिती मतदारसंघात 7 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. ठाकरे शिवसेनेने महायुतीच्या विरोधात जि. प. साठी 5 व पं. स. साठी 8 जागांवर उमेदवार दिले आहेत. दरम्यान आज शुक्रवारी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांनी ठाकरे शिवसेना पक्षाला राष्ट्रीय काँग्रेसचा पूर्णतः पाठिंबा जाहीर केला आहे, अशी माहिती प्र. तालुकाप्रमुख निलेश जयप्रकाश चमणकर यांनी दिली. नगरपरिषद निवडणुकीत विलास गावडे यांनी 1800 हुन अधिक मते घेतली होती. त्यामुळे याचा आम्हाला तालुका स्तरावर जि. प. व पं. स. निवडणुकीत मोठा फायदा होणार आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे वेंगुर्ला तालुक्यात ठाकरे शिवसेनेची ताकद वाढली आहे.

You cannot copy content of this page