दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी मालवणमधील कलाकारांनी नोंदणी करून घ्यावी
महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर यांचे आवाहन मालवण (प्रतिनिधी) दशावतार लोककलेचे जतन, संवर्धन आणि कलाकारांची अद्ययावत माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती आणि तहसील कार्यालय येथे विशेष नोंदणी कक्ष स्थापन करण्यात येणार असून, इच्छुक कलाकारांसाठी नोंदणी फॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार…
