Headlines

सरमळे नांगरतास येथील बालशिवभक्तांनी साकारलेली रायगड किल्ल्याची प्रतिकृती लक्षवेधी…

⚡सावंतवाडी ता.११-: सरमळे नांगरतास येथील बालशिवभक्तांनी साकारलेली रायगड किल्ल्याची प्रतिकृती लक्षवेधी ठरली असून या विद्यार्थ्यानी दिवाळी सुट्टीत मातीचा आकर्षक किल्ला बनवून दिवाळीची सुट्टी खऱ्या अर्थाने सार्थकी लावली.यावेळी या मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसह मिरवणूक काढली त्यानंतर या मूर्तीचे गडावर पूजन करण्यात आले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे निवृत्त उपनिरीक्षक उत्तम शंकर गावडे यांच्याहस्ते या रायगड किल्ल्याच्या…

Read More

‘प्रागतिक चळवळीचे प्रवर्तक’ ग्रंथास ‘कोमसाप’चा पुरस्कार…

कणकवली : शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सोमनाथ दत्तात्रय कदम यांच्या प्रा. सोमनाथ कदम ‘प्रागतिक चळवळीचे प्रवर्तक’ या ग्रंथास कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने देण्यात येणारा प्रभाकर पाध्ये स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रा. सोमनाथ कदम यांनी गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, महंमद पैगंबर, – चार्वाक, संत कबीर, गुरु रविदास, – बसवेश्वर, चक्रधर…

Read More

दीपक केसरकर राज्यात १ नंबरचे मताधिक्य मिळविणार…

अशोक दळवी:राजन तेली जनतेने वारंवार नाकारलेले उमेदवार… ⚡सावंतवाडी ता.११-: ही निवडणूक वाईट प्रवृत्ती विरुद्ध कर्तुत्वान कार्यसम्राट जनसेवक अशीच होत आहे. जनतेने वारंवार नाकारलेले पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. के सरकारने गेल्या पाच वर्षात अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मतदार संघासाठी आणला. त्यांचे कार्य, विनयशीलता, महायुतीची भक्कम साथ, माजी मुख्यमंत्री न खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र…

Read More

भाजप आंबोली मंडल उपाध्यक्षपदी सुभाष राऊळ यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.११-: भारतीय जनता पार्टी आंबोली मंडल उपाध्यक्षपदी सुभाष राऊळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची नियुक्तीपत्र आमदार नितेश राणे यांच्या हस्ते देण्यात आला आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Read More

पंधरा वर्षे आमदार असलेल्या दीपक केसरकरांनी दिव्यांग बांधवांसाठी काय केले…?

स्वप्निल लातये:मतामाठी भावनिक राजकारण करताय त्याला दिव्यांग बांधव कधीच बळी पडणार नाही… ⚡सावंतवाडी ता.११-: गेले पंधरा वर्षे आमदार असलेल्या दीपक केसरकरांनी दिव्यांग बांधवांसाठी काय केले? कोणती सेवा दिली? असा सवाल स्वराज्य दिव्यांग संघटना अध्यक्ष स्वप्निल लातये यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की आमदार दीपक केसरकर तुम्ही पंधरा वर्षात…

Read More

नेमळे गावातून 500 पेक्षा जास्त लीड देण्यासाठी प्रयत्न करा…

रुपेश राऊळ यांच ग्रामस्थांना आवाहन: हक्काचा आमदार मिळाल्यास विकास काय असतो ते दाखवून देऊ… ⚡सावंतवाडी ता.१०-: तेली यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले उमेदवार आहेत त्यामुळे श्री तेली यांना नेमळे गावातून 500 पेक्षा जास्त लीड देण्यासाठी प्रयत्न करा,असे आवाहन शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केले. दरम्यान तेली यांच्या रूपाने या मतदारसंघाला आमदार मिळाल्यास…

Read More

केसरकरांनी मतदार संघाचा विकास केला तर साड्या का वाटाव्या लागतात…?

राजन तेली:एकदा सेवा करण्याची संधी द्या तुम्हाला अपेक्षित विकास नक्कीचच करेन.. ⚡सावंतवाडी ता.१०-: येथील मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या हेकेखोरपणा आणि हट्टीपणामुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सारखा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला नाही.त्यामुळे अशा निष्क्रिय आणि खोटारड्या आमदाराला घरी बसवा.केसरकरांनी मतदार संघाचा विकास केला तर साड्या का वाटाव्या लागतात असा सवाल महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी…

Read More

मसुरे सुपत्र श्रीकांत सावंत यांच्या परीश्रमातून साकारलेल्या श्री संचारेश्वर दीपावली विशेषांकाचे प्रकाशन…!

⚡सावंतवाडी ता.१०-: दत्त माऊली आश्रम, माहुल गांव चेंबूर, मुंबई येथे धर्मभास्कर सद्गुरू संचारेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्राची आणि कार्याची ओळख करून देणाऱ्या दीपावली विशेषांकाचे प्रकाशन ८ नोव्हेंबर २०२४ रोजी झाले. सद्गुरु पाचलेगांवकर तथा श्री संचारेश्वर महाराजांचे परमभक्त असणारे सिंधुदुर्ग मसुरेचे सुपुत्र व मुंबईस्थित दिपावली विशेषांकाचे मुंबई स्थित मुख्य संपादक श्रीकांत सावंत यांच्या परिश्रमातून हा दीपावली…

Read More

मी कोकणी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही…

अर्चना घारे परब:मतदार संघात महिला उभी राहिल्याने विरोधकांना धडकी भरली.. वेंगुर्ले: महिला उमेदवार उभी राहिल्याने विरोधी उमेदवारांना धडकी भरली आहे. मी कोकणी मुलगी आहे, मोडेन पण वाकणार नाही. तुमच्या मागण्या सोडविण्यासाठी मी कटिबध्द आहे. मला तुमचं एक मत देऊन मतदारसंघ योग्य हातात द्या असे आवाहन अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी केळुस कालवेबंदर येथील ग्रामस्थांना…

Read More

उभादांडा गिरपवाडी येथे घराला आग लागल्याने सुमारे साडे चार लाखांचे नुकसान…

मासेमारीची जाळी जळून खाक : सुदैवाने मोठा अनर्थ टळला.. वेंगुर्लेवेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा गिरपवाडी येथील कालिंदी तोरस्कर यांच्या घराला आग लागल्याने सुमारे साडे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने वेळीच आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असे सांगितले जात आहे.गिरपवाडी येथील कालिंदी तोरस्कर यांचे भरवस्तीत घर आहे. शनिवारी रात्री साडेनऊ…

Read More
You cannot copy content of this page