घनकचरा प्रकल्पावरून कुडाळ नगर पंचायत मध्ये खडाजंगी…
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये घनकचरा प्रकल्पावरून घमासान झाले. घनकचरा प्रकल्प करायचा असेल तर नगरपंचायतीच्या मालकीच्या जागेमध्ये करा अशी मागणी भाजपा नगरसेवकांनी केली, तर महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी घनकचरा प्रकल्प मच्छी मार्केटमध्ये उभारण्यात यावा अशी मागणी केली. या विषयावरून सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नगरसेवक आक्रमक झाले. अखेर हा विषय तीन महिन्यानंतर पुन्हा पटलावर घेतला जाईल…
