Headlines

Global Maharashtra Breaking News

संस्थानकालीन मोती तलावात सावंतवाडीकरांकडून नारळ अर्पण…!

⚡सावंतवाडी ता.०८-: नारळी पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे येथील संस्थानकालीन मोती तलावात सावंतवाडीकरांकडून नारळ अर्पण करण्यात आला. शेकडोंच्या उपस्थित हा नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला.सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले व पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते मानाच्या सुवर्ण नारळाचे पूजन करण्यात आले. पूजनानंतर मोती तलावात मानाचा नारळ अर्पण करण्यात आला. तदपुर्वी सावंतवाडी पोलिसांकडून मानाच्या श्रीफळाची शहरातून…

Read More

तालुकास्तरीय वैद्यकीय मूल्यांकन शिबिर संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.०८-: राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि अखिल भारतीय शिक्षा समागम समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच वेंगुर्ला येथील उपजिल्हा रूग्णालयात विशेष मोहिम अंतर्गत तालुकास्तरीय वैद्यकीय मूल्यांकन शिबिर घेण्यात आले. फोटोओळी-तालुकास्तरीय वैद्यकीय मूल्यांकन शिबिरात विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.

Read More

स्मामिनी महिला मंडळ, निसर्ग फाऊंडेशन यांचा रक्षाबंधन उपक्रम…

आ निलेश राणेंना बांधली राखी.. ओरोस ता ८स्वामिनी महिला मंडळ आणि निसर्ग फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री जांमभेकर स्मारक पत्रकार भवन येथे रक्षाबंधनाच्या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाला कुडाळ मालवणचे आ निलेश राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते. यावेळी उपस्थित महिला भगिनींनी रक्षाबंधन साजरे करत मोटारसायकल वाहनधारकांना हेल्मेटचे…

Read More

जिल्हास्तरीय शालेय जुडो स्पर्धेत कु. हेमांगी मेस्त्री प्रथम…

⚡सावंतवाडी ता.०८-: ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेतचराठा गावची कन्या असलेली तर माजगाव येथील श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. हेमांगी गजानन मेस्त्री हिने प्रथम क्रमांक पटकाविला. आता तिची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय जुडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.कु. हेमांगी मेस्त्री हिने यापूर्वी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. हेमांगी…

Read More

कारागृहाचे निष्कृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या संबंधितांवर तात्काळ कारवाई करा…

ठाकरे सेनेची मागणी: बांधकाम विभागासमोर छेडले बॅण्ड बाजा बारात आंदोलन: केसरकरांचं मतदारसंघात लक्ष नसल्याने रस्त्यांची अवस्था बिकट, बाबुराव धुरी यांचा आरोप.. ⚡सावंतवाडी ता.०८-:*  पंधरा दिवसाची मुदत देतो तात्काळ संबंधितांवर कारवाई करा ,अन्यथा शिवसेना 25 ऑगस्टला 21 ढोल व गाढव आणून बांधकाम विभागाला सलामी देऊन अनोखे आंदोलन करेल  असा थेट इशारा सावंतवाडी ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख…

Read More

मळेवाड येथे विद्यार्थ्यांच्या राखी विक्री स्टॉलला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद…!

⚡सावंतवाडी ता.०८-: ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेच्या नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत राख्या बनविणे हस्तकलेत श्री कुलदेवता विद्यामंदिर मळेवाड शाळा नंबर 2 च्या विद्यार्थ्यांनी हस्तकलेतून निर्माण केलेल्या राख्यांचा शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट ला ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेच्या आठवडा बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी स्टॉल लावला होता. या स्टॉलमुळे मुलांना आपल्या तयार केलेल्या मालाची विक्री कशी करावी याचे थोडेसे व्यावसायिक ज्ञान प्राप्त झाले.या स्टॉलला…

Read More

कोलगाव गावातील सर्व शाळा व अंगणवाडी मधील मुलांना शिवसेनेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण…!

⚡सावंतवाडी ता.०८-: शिवसेनेच्यावतीनेकोलगाव गावातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा व अंगणवाडी मधील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या संकल्पनेतून या शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी सर्व शाळा व अंगणवाडी यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यात आल्या. या शाळा व अंगणवाडी यांना सोयी व…

Read More

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न…

गणेशोत्सव काळात कणकवली शहरात वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी उपाययोजना करा:महावितरण विभागाने वीज पुरवठा सुरळीत ठेवावा.. कणकवली : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील वाहतूक व्यवस्था, विजवीतरणाच्या समस्या व अन्य शासकीय विभाग प्रमुखांच्या येथील कणकवली नगरपंचायत हॉल मध्ये बैठक पार पडली. यामध्ये नगरपंच्यातच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी गणेशोत्सव काळात शहरात…

Read More

सावंतवाडी रेल्वे स्थानकावर लवकरचं ‘लिफ्ट’ ची सुविधा…

कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पाठपुराव्याला यश.* ⚡सावंतवाडी ता.०७-: कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पाठपुराव्याला यश मिळालं असून सावंतवाडी रेल्वे स्थानकावर लवकरच दोन लिफ्ट बसवण्यात येणार आहेत. यामुळे वृद्ध, दिव्यांग, लहान मुलं आणि महिला प्रवाशांना प्लॅटफॉर्म 1 आणि 3 वर चढणे-उतरणे सोयीचे होईल. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने यासाठी पाठपुरावा केला होता. याला यश आल्याची माहिती…

Read More

चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निधी उपलब्ध करून द्या…

मंगेश तळवणेंकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी: शहरातील विविध समस्यांबाबत पालकमंत्र्यांकडे निवेदनद्वारे वेदले लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी शहरात नगरपरिषद आणि पोलिस स्टेशन मिळून एकूण ७४ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, परंतु त्यापैकी केवळ १५ कॅमेरे सुरू आहेत. तसेच, जे कॅमेरे सुरू आहेत, त्यांची गुणवत्ता चांगली नसल्याने त्यात व्यक्ती स्पष्ट दिसत नाही. शहरात वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी किमान १५०…

Read More
You cannot copy content of this page