अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांचा सावंतवाडीत दमदार प्रचार…

जनतेच्या प्रतिसादावर व्यक्त केला विजयाचा विश्वास..

⚡सावंतवाडी ता.२५-: नगराध्यक्षपदासाठीच्या अपक्ष उमेदवार माजी उपनगराध्यक्षा सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी शहरात जोरदार प्रचार केला. अपक्ष असले तरीही सावंतवाडीची जनता आमच्यासोबत आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शहरातील प्रत्येक प्रभागात जात त्यांनी जोरदार प्रचार केला. यावेळी श्री. आचार्य, ऐश्वर्या कोरगावकर, अखिलेश कोरगावकर, व्यंकटेश शेट आदींसह कोरगावकर यांचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. जनतेचा मिळणारा प्रतिसाद बघता अन्नपूर्णा कोरगावकर विजयी होतील असा विश्वास समर्थकांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page