रुपेश राऊळ: एकनाथ शिंदेंचा फोन संजू परबांना येतो यावरून केसरकर यांच वरिष्ठ पातळीवर वजन कमी झालं..
⚡सावंतवाडी ता.२५-: भाजपला पराभव जाणवू लागल्याने आता राज्यातील भाजपचे नेते सावंतवाडीत सभा घेण्यासाठी , वेळ आली आहे, अशी टीका ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केली. सावंतवाडीचा विकास योग्य वेळी झाला असता तर आज अशी वेळ आली नसती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राऊळ पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संजू परब यांना फोन करतात, यावरून दीपक केसरकर यांचे प्रभावक्षेत्र वरिष्ठ पातळीवर खालावले आहे, हे सिद्ध होते. या निवडणुकीत केसरकर यांच्या गटातील अनेकांचे तिकीटही कापण्यात आले आहे.नितेश राणे ज्या अर्थाने बोलतात रवींद्र चव्हाण यांचा एका फोनवर दीपक केसरकर व्यासपीठावर येऊ शकतात य यावरून कोणाचा गेम होणार हे जनतेने ओळखायला हवे, असा घणाघातही राऊळ यांनी केला.
दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त असून नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राऊळ यांनी केला. आता जनतेनेच त्यांना योग्य जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सीमा मठकर या सर्वसामान्य लोकांना सहज उपलब्ध राहणाऱ्या, बाजारात ‘गो सीमा’ म्हटले तरी थांबून संवाद साधणाऱ्या उमेदवार आहेत. त्यामुळे अशा जमिनीवरच्या उमेदवारांच्या पाठीशी जनता उभी राहील, असा मला विश्वास आहे, असे राऊळ यांनी सांगितले.
