Global Maharashtra Breaking News

मध्यामिकच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लाक्षणिक उपोषण…

शिक्षण विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी.. सिंधुदुर्गनगरी ता २८माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कामे निकाली निघत नसल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज २८ एप्रिलला शिक्षणाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी जिल्हा परिषद भवनसमोर शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी लाक्षणिक उपोषण केले . सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा असून या जिल्ह्यात शिक्षणाधिकारी माध्यमिक विभागा कडून कायमच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे…

Read More

सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात उद्या पारंपारिक शिवजयंती उत्सव…

⚡मालवण ता.२८-:सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अभिमानाचे आणि शिवभक्तांच्या श्रद्धेचे ठिकाण असलेल्या मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यातील जगातील पहिल्या अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराजेश्वर मंदिरात वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७ मंगळवार दि. २९ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पारंपारिक जन्मोत्सव समारंभ साजरा होणार आहे. शिवलंका किल्ले सिंधुदुर्गवर १६९५ पासून छत्रपती राजाराम महाराज यांनी शिवजन्मोत्सव सोहळा सुरू केला…

Read More

जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद ३० रोजी सिंधुदुर्गनगरीत…

पालकमंत्री नितेश राणेंची उपस्थिती:जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची माहिती.. ओरोस ता २८जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक भवन येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद २०२५ यांचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते याचे उद्घाटन होणार असून उद्योग उभारून गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींशी सामंजस्य करार यावेळी…

Read More

पाण्याच्या संशोधनावर आंतरराष्ट्रीय मोहोर…

डॉ. श्रीकृष्ण पारकर यांना डॉक्टरेट,विशेष गौरव पुरस्कार प्रदान… ⚡मुंबई ता.२८-: यु आर एज्यूकनेक्ट (UREDUCONNECT), दिल्ली या आंतरराष्ट्रीय मानांकित सेवाभावी संस्थेमार्फत आयोजित भव्य इंडो-युरोपियन समिट (INDO-EUROPEAN SUMMIT)आणि पुरस्कार सोहळा पार पडला.या सोहळ्यामध्ये हिल अॅकॅडमी, कॅनडाच्या प्रमुख समुपदेशन डॉ. राखी कलेस्कर, महिला आंतरराष्ट्रीय नेटवर्क च्या संचालिका सौ. रेखा तिवारी, पेटीयम चे कायदा सल्लागार डॉ. रुहेल चौधरी तसेच…

Read More

मधाचे गाव आंबोली ब्रॅण्ड तयार करा -राठोड…

⚡आंबोली,ता.२८-: मधाचे गाव आंबोली घोषित करण्यात आले आहे. इथल्या उत्पादनाचा ब्रॅण्ड तयार करा सह्याद्री मधील सर्वात औषधियुक्त मध म्हणून आंबोली ब्रॅण्ड ला अधिक किमत मिळेल असे प्रतिपादन उमेद चे व्यवस्थापक गणेश राठोड यांनी आंबोली येथे केले. मधाचे गाव आंबोली येथे चांदा ते बांदा मधून जिल्हा नियोजन समिती व खादी ग्रामोदयोग मंडळं यांच्या विद्यमानानाने हा कार्यक्रम…

Read More

उन्हाळ्यात १५० हुन जास्त उड्डाणांसाठी फ्लाय९१ सज्ज…

सध्या आठवड्यात होताहेत १०० हुन अधिक उड्डाणे:वर्षभरात ३५०० उड्डाणे आणि १.७ लाख प्रवाशांना सेवा.. सिंधुदुर्ग : गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (एमआयए) आधारित फ्लाय९१ ही प्रादेशिक विमान सेवा सध्या आठवड्याला १०० हून अधिक उड्डाणे करत आहे. येणाऱ्या उन्हाळ्यात ही संख्या १५० पर्यंत वाढवण्याची योजना विमान सेवा आखात आहे असे सेवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.फ्लाय९१ने मार्च २०२५ मध्ये…

Read More

सेवा हक्क कायदा ‘दशकपूर्ती’ कार्यक्रम…

नागरिकांना पारदर्शक व कालमर्यादेत सेवा द्या:जिल्हाधिकारी अनिल पाटील.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२८-: नागरिकांना शासनामार्फत व शासनाच्या अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक व कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला आहे. या अधिनियमाअंतर्गत नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा देण्यासाठी ह्या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले. श्री शेवाळे…

Read More

महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्याकडून सिंधुदुर्गात जल्लोषी स्वागत…

कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव रथ यात्रेचा शुभारंभ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडला. यानंतर ही रथयात्रा सिंधुदुर्ग येथे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बाप्पा सावंत यांच्या नेतृत्वाखाली आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी या रथयात्रेचे जल्लोषात स्वागत…

Read More

बांदा पानवळ येथे महावितरणचा विद्युत खांब हा धोकादायक…

बाळा आकेरकर: त्वरित बदलण्याची केली महावितरण कडे मागणी.. ⚡बांदा ता.२८-: बांदा पानवळ येथे महावितरणचा विद्युत खांब हा धोकादायक स्थितीत कलंडला असून तो केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. याबाबत माजी सरपंच बाळा आकेरकर यांनी लक्ष वेधले असून अपघात टाळण्यासाठी लवकरात लवकर हा खांब बदलावा अशी मागणी केली आहे.

Read More

गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत भंडारी प्राथमिक शाळेचा नील मोरजकर राज्यात तिसरा…

⚡मालवण ता.२८-:मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या गुरुकुल प्रज्ञा शोध (GTS) परीक्षेत मालवण येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेचा विद्यार्थी नील शशिकांत मोरजकर याने राज्यात तिसरा क्रमांक पटकवला आहे. तसेच श्रीनिधी युवराज तारी हिने राज्यात दहावा व जिल्ह्यात पाचवा, तर श्रावणी भूपेश गोसावी हिने राज्यात चौदावा आणि जिल्ह्यात व तालुक्यात चौदावा क्रमांक मिळवला आहे. गुरुकुल प्रज्ञा…

Read More
You cannot copy content of this page