Global Maharashtra Breaking News

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…!

२०२३-२४ साठी कोकण विभागातून कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला जाहीर.. ⚡ओरोस ता ६-: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन, मुंबई याचे मार्फत २०२३-२४ करीता दिला जाणारा कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार कोकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाला असुन महाराष्ट्रातील जिल्हा बँकांसाठी हा…

Read More

तेंडोली-भोमवाडीत ८ जून ला संयुक्त दशावतार…!

⚡कुडाळ ता.०६-: तेंडोली-भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवी कला क्रीडा मंडळाच्यावतीने ८ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता तेथीलच श्री अनलादेवी मंदिरात जिल्ह्यातील निवडक दशावतार कलाकारांचे ‘भानुमती स्वयंवर’ संयुक्त दशावतार नाटक होणार आहे.या नाटकात पुढील कलाकार आहेत. गणपती- नाना प्रभू, रिद्धी-सिद्धी-चैतन्य राऊळ,भीष्म- संजय वालावलकर, दुर्योधन- साईप्रसाद तवटे, कर्ण-गिरीश राऊळ, शल्य- साहिल तळकटकर, अर्जुन- विलास तेंडोलकर, राजा- आनंद…

Read More

नेरुर येथे ८ जून रोजी मोफत महाआरोग्य शिबिर…

कुडाळ : केंद्र शासनाच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ , गोवा तसेच कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट व बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालय व फिजिओथेरपी महाविद्याल यांच्या सहकार्याने रविवार दिनांक 08 जून 2025 रोजी कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व…

Read More

शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक राजेंद्र वाळके यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन…!

⚡सावंतवाडी ता.०६-: शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक राजेंद्र उर्फ राजन शांताराम वाळके (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन झाले.‌ आज सकाळी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाजारपेठेतील लता लॉज, वाळके टॉवरचे ते मालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन सूना, नात, पुतणे, बहीणी असा मोठा परिवार आहे. राहुल वाळके, रूपेश वाळके यांचे ते वडील…

Read More

मळगाव येथील मायापूर्वचारी मंदिर परिसरात पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण…

मूर्ती पुनः प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त देण्यात आला वृक्ष संवर्धनाचा संदेश.. ⚡सावंतवाडी ता.०६-: मळगाव येथील मायापूर्वचारी मंदिर परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लावा, वृक्ष जगवा, पर्यावरण वाचवा या संकल्पनेंतर्गत काल गुरुवारी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला.दिवसेंदिवस पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी शासनाने विविध माध्यमातून वृक्षारोपण करण्याचे आदेश दिले आहेत. याच शासनाच्या आदेशाचे पालन करून सध्या होत…

Read More

पर्यावरणदिनी वायंगणी येथे कासवमित्रांचा सन्मान…

वेंगुर्ला प्रतिनिधी- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भाजपा किसान मोर्चा-सिधुदुर्गतर्फे कासव संवर्धनासाठी अतुलनीय योगदान देणा-या वायंगणी येथील सहा कासवमित्रांचा सन्मान करण्यात आला.

Read More

माझा सिंधुदुर्ग विकास संस्थेतर्फे ७ रोजी शिष्यवृत्ती वितरण सोहळा…

⚡मालवण ता.०५-:माझा सिंधुदुर्ग विकास संस्थेच्या वतीने शालेय शिष्यवृत्ती वितरण सोहळा शनिवार दि. ७ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मराठा समाज सभागृह, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात माझा सिंधुदुर्ग विकास संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निराधार तसेच प्रतिकूल परिस्थितीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणास आधार देण्याच्या उद्देशाने संपूर्ण वर्षासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य…

Read More

मालवणात उद्या शिवराज भूषण नाटकाचा प्रयोग ; शिवसाहित्य प्रदर्शनाचेही आयोजन…

⚡मालवण ता.०५-:शिवराज्याभिषेक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त श्री शिवराज मंच मालवण आयोजित आणि निर्मित शिवराज भूषण या ऐतिहासिक महानाट्याचे सलग दोन प्रयोग दि. ६ व ७ जून रोजी मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे संपन्न होणार आहेत. यानिमित्त मामा वरेरकर नाट्यगृहात श्री शिवराज मंच व हिंदवी आर्ट्स यांच्या वतीने शिवसाहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उदघाटन किल्ले…

Read More

कंटेनरची कारला धडक, कारचे मोठे नुकसान…

कणकवली : कोल्हापूरहून फोंडाघाटच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरची कारला धडक बसली. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, वाहनांचे विशेष कारचे नुकसान झाले. हा अपघात गुरुवारी सायंकाळच्या वाजण्यास सुमारास फोंडाघाट येथील एका हॉटेलसमोर झाला. कंटेनर चालक मोहम्मद सोहेल खान (४२, रा. मध्य प्रदेश) हा आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन घाटमार्गातून फोंडाघाट दिशेने येत होता. तर कार…

Read More

एसटी वाहतूक नियंत्रक अनाजी गावडे यांचा कथामालेतर्फे सेवानिवृत्तीपर सत्कार…

⚡मालवण ता.०५-:मनमोकळा स्वभाव आणि सेवामयी वृत्तीने प्रवाशांमध्ये लोकप्रिय झालेले आचरे येथील एसटी वाहतूक नियंत्रक अनाजी गावडे यांचा साने गुरुजी कथामाला शाखा मालवणच्या वतीने सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. साने गुरुजी कथामाला मालवण दरवर्षी सेवामयी कर्मचाऱ्यांचा सत्कार करते. एसटी वाहतूक नियंत्रक कक्ष आचरे येथे वाहतूक नियंत्रक अनाजी गावडे यांच्या सेवानिवृत्ती सदिच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी…

Read More
You cannot copy content of this page