मळगावात नववर्ष स्वागतासाठी भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२९-: नवीन वर्ष २०२६ चे जल्लोषात स्वागत करण्यासाठी भिल्लवाडी ग्रुप यांच्या आयोजनाखाली व विश्वकला मंच यांच्या निर्मितीत मळगाव येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा नववर्ष स्वागत सोहळा मंगळवार, ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.३० ते रात्री १२ वाजेपर्यंत मळगाव येथील आझाद मैदानावर रंगणार आहे.
या कार्यक्रमात संगीत, नृत्य, कला व संस्कृतीचा सुरेल संगम अनुभवता येणार असून नववर्षाचे स्वागत आनंदमय वातावरणात करण्याची सुवर्णसंधी नागरिकांना लाभणार आहे. स्थानिक कलाकारांसह विविध सांस्कृतिक सादरीकरणांमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार होणार आहे.
गावातील सर्व रसिक प्रेक्षकांनी कुटुंबीय व मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घ्यावा, असे आवाहन भिल्लवाडी ग्रुपचे अध्यक्ष श्री. पांडुरंग राऊळ यांनी केले आहे.
आनंद, उत्साह आणि नव्या संकल्पांसह नवीन वर्षाचे स्वागत एकत्र करण्यासाठी मळगावकरांनी या भव्य सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आयोजकांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page