बांदा येथे ४ जानेवारी रोजी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा आनंद मेळावा…

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन, सावंतवाडी शाखेचा आनंद मेळावा रविवार, ४ जानेवारी रोजी बांदा येथील संतोषी माता मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
विद्येचा दिवा आयुष्यभर तेवत ठेवणारे गुरुजन कधी निवृत्त होत नाहीत, ते केवळ अध्यापनातून विश्रांती घेतात” या भावनेतून
या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आनंद मेळाव्यात जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांच्यासह जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. अनेक वर्षे ज्ञानदानाच्या सेवेत एकत्र काम केलेले मित्रपरिवार या निमित्ताने पुन्हा एकत्र येणार असून, हास्य, आठवणी आणि अनुभवांची देवाण घेवाण होणार आहे. त्यामुळे या आनंद मेळाव्याला सर्व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख, व विस्तार अधिकारी यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन अध्यक्ष दत्ताराम फटनाईक यांनी केले आहे.

You cannot copy content of this page