Global Maharashtra Breaking News

पालकमंत्री नितेश राणे यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद…

रक्तदान शिबिरात ८१ रक्तदात्यांनी केले रक्तदान:भाजपच्यावतीने सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या उपक्रमाचे आयोजन.. ⚡कणकवली ता.२२-: मत्स्य व बंदरे विकास मंत्री, पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका आणि कणकवली शहर भाजपाच्या वतीने कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवार २२ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले….

Read More

आनंद जाधव यांचे काल रात्री अल्प आजाराने निधन…!

⚡सावंतवाडी ता.२२-: जिमखाना मैदान भटवाडी येथील रहिवासी आनंद आत्माराम जाधव वय वर्ष 40 यांचे काल रात्री अल्प आजाराने निधन झाले. कट्टर राणे समर्थ म्हणून सावंतवाडी शहरामध्ये त्यांची ओळख होती. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांचे ते चुलत भाऊ होते. त्यांच्या पश्चात आई व त्यांचा एक मोठा परिवार आहे. आज दुपारी बारा वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार…

Read More

गोवा मुक्तिसंग्रामात बांदावासियांचे योगदान अविस्मरणीय…

उमेश गाड यांची भावना.. ⚡बांदा ता.२२-: गोव्याच्या मुक्तिसंग्रामात बांदावासियांचे अतुल्य योगदान आहे. गोमंतकीय जनता हे योगदान कधीही विसरू शकत नाही. माझ्या स्वर्गीय वडिलांसोबत त्याकाळी बांद्यातील जनता खांद्याला खांदा लावून लढली. त्यामुळे बांद्यातील माझा सत्कार हा विशेष असल्याचे भावोद्गार कडशी-मोपा (गोवा) येथील उमेश गार्ड यांनी काढले.स्वातंत्र्यसैनिक (कै.) शंकर गाड यांच्या पश्चात उमेश गाड यांना गोवा शासनाने…

Read More

संत निरंकारी मिशनतर्फे जिल्ह्यात पाच ठिकाणी योग शिबिर ..

वेंगुर्ला प्रतिनिधी- संत निरंकारी मिशन तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून सिधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस, माजगांव, कणकवली, देवगड आणि वेंगुर्ला येथे एकाचवेळी पाच ठिकाणी योग शिबिर घेण्यात आले. सर्वच ठिकाणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फोटोओळी-संत निरंकारी मिशनच्या योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Read More

नारिंग्रे अपघातात चार तरुणांचा मृत्यू; माजी आमदार वैभव नाईक यांची अंत्ययात्रेत उपस्थिती…

⚡मालवण ता.२१-: नारिंग्रे येथे एसटी आणि रिक्षा यांच्यात झालेल्या दुर्दैवी अपघातात आचरा येथील संकेत सदानंद घाडी, संतोष रामजी गावकर,सुनील सूर्यकांत कोळंबकर आणि रोहन मोहन नाईक या चार तरुणांचे दुःखद निधन झाले आहे. या दुर्दैवी घटनेबाबत माजी आमदार वैभव नाईक यांनी शोक व्यक्त करत आज तरुणांच्या अंत्ययात्रेत ते सहभागी झाले. तसेच कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करत…

Read More

कट्टा येथील आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

⚡मालवण ता.२१-:युवा सामाजिक कार्यकर्ते, आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांच्या वाढदिवसानिमित्त कट्टा येथील स्मिता कंप्युटर इन्स्टिट्युटच्यावतीने कट्टा येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात कट्टा परिसरातील १०१ गरजू लोकांची रक्त तपासणी, थायरॉईड, कॅल्शियम, हिमोग्लोबीन, सीबीसी, डायबेटिस, थायरॉईड फंक्शन टेस्ट करण्यात आल्या. तर २५ जणांनी इसीजी रिपोर्टचा लाभ घेतला. या शिबिराचे उदघाट्न कट्टा…

Read More

ओझर विद्यामंदिरमध्ये दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव…

⚡मालवण ता.२१-:मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती मुंबई संचालित ओझर विद्या मंदिर कांदळगाव या शाळेतील दहावी परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रशालेत संपन्न झाला. यावेळी संस्थेच्या वतीने तसेच इतर मान्यवर पुरस्कर्त्यांच्या वतीने विविध प्रकारची पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर मालवण पंचायत समितीचे माजी सभापती तथा संस्थेचे पदाधिकारी उदय परब,…

Read More

उभादांडा केंद्र शाळेच्या हॉल चे छप्पर कोसळले : शाळेत मुले नसल्याने मोठी दुर्घटना टळली…

हॉलच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचा दुर्लक्ष : पालकांकडून संताप व्यक्त.. वेंगुर्ला प्रतिनिधीवेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषद उभादांडा केंद्रशाळा नंबर १ या शाळेचा हॉल नादुरुस्त बनला आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही या हॉलच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाकडून लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे आज या हॉलचा पुढील छपराचा भाग सायंकाळी कोसळला असून उर्वतीत भागही कोसळण्याच्या स्थितीत आहे. दरम्यान आज शनिवार…

Read More

शिवाजी वाचन मंदिर व रेवतळे शाळा यांच्यातर्फे योग दिन साजरा…

⚡मालवण ता.२१-:मालवण येथील श्री शिवाजी वाचन मंदिर आणि जि. प. प्राथमिक शाळा रेवतळे यांच्यातर्फे जागतिक योग दिन रेवतळे शाळेत साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक श्री. देविदास प्रभूगांवकर यांनी ‘एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग’ हे घोषवाक्य घेऊन योगाचे महत्व मुलांना सांगितले. तसेच मुलांकडून विविध योगासने करून घेतली. या योगासन कार्यक्रमात शिवाजी वाचन मंदिरचे उपाध्यक्ष…

Read More

सिंधुदुर्ग भाजपकडून मंडलस्तरावर योग दिन साजरा…

कुडाळ : जागतिक स्तरावर आज २१ जून हा “जागतिक योग दिन साजरा होत असताना सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाने सुद्धा प्रत्येक मंडलात योग दिन सर्वसामान्य जनतेसोबत साजरा केला.सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ एमआयडीसी येथे योग दिन शिबिर संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची…

Read More
You cannot copy content of this page