राज्यस्तरीय शस्त्रांग मार्शल आर्ट्स स्पर्धेत आंबोलीच्या ग्रेटा कर्पे हिला सुवर्ण पदक…

आंबोली,ता.७ : छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय क्रीडा संकुल गारखेडा स्टेडियम येथे राज्यस्तरीय शस्त्रांग मार्शल आर्टस स्पर्धेतील एअर शिल्ड गर्ल्स गटात ग्रेटा महेश कर्पे, आंबोली,बाजारवाडी, सध्या रा. सांगली, हिने सुवर्णपदक पटकावले. तिची राष्ट्रीय शस्त्रांग मार्शल आर्टस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धा शस्त्रांग मार्शल आर्टस महाराष्ट्र राज्य संघटना तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे सर्व नियोजन राज्य संघटना प्रमुख मिलिंद काटमोरे यांनी केले. ग्रेटा ही जिद्द स्पोर्टस फाऊंडेशन सांगलीची खेळाडू आहे. तिला सांगली जिल्हा अध्यक्षा काजल लोंढे, सचिव प्रथमेश लोंढे, ग्रामीण सचिव पारस माने, तासगाव तालुका प्रमुख शुभम लांडगे, शितल पारसे, सुशांत दुधाळ, श्रेया कदम, सुजाता दुधाळ यांचे मार्गदर्शन तसेच वडील महेश व आई स्वाती यांचे प्रोत्साहन लाभले. या स्पर्धेतील यशाबद्दल आंबोली ग्रामस्थ तसेच विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page