प्लास्टिकचा वापर टाळत पर्यावरणपुरक शारदोत्सव…
⚡वेंगुर्ला ता.०७-: एकिकडे दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर वाढत असतानाच बाल गणेश मंडळातर्फे यावर्षी पर्यावरणपुरक शारदोत्सव साजरा करण्यात आला. प्लास्टिकच्या पत्रावळी आणि द्रोण यांना फाटा देत केळीच्या झाडांच्या पानांचा वापर करण्यात आला.वेंगुर्ला शहरातील भटवाडी येथील बाल गणेश मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी शारदोत्सव साजरा करण्यात आला. हा शारदोत्सव साजरा करताना मंडळाने समाजासमोर एक…
