⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगर परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक, पक्षाचे BLA आणि प्रमुख पदाधिकारी यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर हॉटेल मॅंगो बॅकवेट हॉल येथे पार पडले.
शिबिराचे उद्घाटन श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इरशाद शेख, जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, काँग्रेस नेते एड. दिलीप नार्वेकर, शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र मापसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारी, निवडणूक प्रक्रिया, पक्ष संघटन बळकटीकरण तसेच निरीक्षकांची जबाबदारी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. वेंगुर्ला तालुका काँग्रेस अध्यक्ष विधाता सावंत यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
कार्यक्रमास युवक काँग्रेस शहर अध्यक्ष बासिप पडवेकर, शिवा गावडे, माया चिटणीस, ओबीसी शहराध्यक्ष संतोष मडगावकर, सुमेधा सावंत, विठ्ठल केदार तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराचे सूत्रसंचालन रवींद्र मापसेकर यांनी केले तर आभार शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांनी मानले.
