अवैध दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर मोठी कारवाई…

१ कोटी ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त: दोन जण ताब्यात..

⚡बांदा ता.०७-: राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली सिंधुदुर्ग येथील पथकाने गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष कारवाई केली. ही कारवाई सुमारे १ कोटी ८ लाख रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

उपायुक्त डॉ. राजेश देशमुख आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही दृढ कारवाई झाली. कारवाईदरम्यान संशयित ट्रक क्रमांक GJ-10-Z-9984 येथून विविध १५०० पेट्या विदेशी दारू आणि बिअर मिळून आली. एकूण ४८ हजार लिटर दारू, ३४४७०० मिली व ९१००० मिली विदेशी दारू जप्त केली आहे. यासंबंधी २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून वाहनासह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

You cannot copy content of this page