Headlines

Global Maharashtra Breaking News

रॉंग साईडने येणाऱ्या दुचाकीची कारला जोरदार धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी…

⚡सावंतवाडी ता.२४-:रॉंग साईडने येणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याची घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उपरलकर देवस्थानच्या वळणावर घडली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीस्वाराच्या डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे सुदैवाने त्याचा जीव वाचला. मात्र या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती देत जखमी दुचाकीस्वारास प्राथमिक उपचारासाठी…

Read Full News

शिरगाव गावची ग्रामदैवता श्री. पावणाई देवीच्या चरणी नतमस्तक होऊन…

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा शुभारंभ.. ⚡देवगड ता.२४-:शिरगाव गावची ग्रामदैवता श्री. पावणाई देवीच्या चरणी नतमस्तक होऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप–शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. शिरगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्री. देवदत्त दामोदर कदम, शिरगाव पंचायत समिती गटाच्या उमेदवार कु. शितल सुरेश तावडे तसेच तळवडे पंचायत समिती गटाच्या उमेदवार सौ. सलोनी…

Read Full News

क्रिडाईतर्फे कोल्हापूरमध्ये ३० पासून १३ वे दालन प्रदर्शन…

बांधकाम आणि वास्तू विषयक स्टॉल्स :आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते उदघाटन.. ⚡कुडाळ ता.२४-: क्रिडाई कोल्हापूर यांच्या वतीने येत्या 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान कोल्हापूरच्या महासैनिक दरबार हॉल मध्ये भव्य बांधकाम आणि वास्तू विषयक १३ व्या ‘दालन’ प्रदर्शनाच आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाच उदघाटन 30 जानेवारीला सकाळी ११ वाजता कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या…

Read Full News

कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे अपक्ष उमेदवार मंगेश तळवणेकर थेट बांधावर…

ना कार्यकर्त्यांची फौज, ना गाड्यांचा ताफा; ‘एकला चलो’ रणनीतीतून मतदारांशी थेट संवाद ⚡सावंतवाडी ता.२४-: कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या मंगेश तळवणेकर यांनी अनोख्या आणि थेट जनतेशी जोडणाऱ्या प्रचाराची सुरुवात केली आहे. ना मोठी कार्यकर्त्यांची फौज, ना वाहनांचा ताफा—केवळ दुचाकीवरून थेट बांधावर जाऊन त्यांनी मतदारांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. आज…

Read Full News

भाजप – शिवसेना महायुतीच्या रुहिता राजेश तांबे विजयी…

जाणवली जि. प. मतदारसंघ बिनविरोध.. ⚡कणकवली ता.२४-: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाणवली जिल्हा परिषद मतदार संघात भाजप – शिवसेना महायुतीच्या उमेदवार रुहिता राजेश तांबे या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. उबाठा गटाच्या उमेदवार हेलन जितेंद्र कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने हा जिल्हा परिषद मतदारसंघ बिनविरोध झाला. उबाठा सेनेच्या उमेदवार हेलन कांबळे…

Read Full News

बांदा जिल्हा परिषदेतून भाजपचे उमेदवार माजी सभापती प्रमोद कामत बिनविरोध…

⚡सावंतवाडी ता.२४-: बांदा जिल्हा परिषदेतून भाजपचे उमेदवार माजी सभापती प्रमोद कामत बिनविरोध ठरले आहेत. अपक्ष उमेदवार सुशांत पांगम यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. माजी सभापती प्रमोद कामत यांची निवड बिनविरोध झाली असून विरोधी अपक्ष उमेदवारान अर्ज मागे घेतला. त्यामुळे जिल्हा परिषदेवर जिल्ह्याच्या सीमेवरून…

Read Full News

भाजपच्या खारेपाटण जि.प. च्या उमेदवार प्राची इस्वालकर बिनविरोध…

ठाकरे सेनेला आणखी धक्का:उबाठा सेनेच्या खारेपाटण जि. प. च्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी घेतली माघार.. कणकवली : तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाकडून ठाकरे सेनेला सलग धक्के दिले जात आहेत. सलग दुसऱ्या दिवशी खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील ठाकरे सेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाच्या निवडणूक रिंगणातून माघार…

Read Full News

स्थानिक म्हणून नेरूर मध्ये गावाचा मलाच कौल…

अपक्ष उमेदवार रुपेश पावसकर यांचा दावा:२७ जानेवारीला भूमिका करणार स्पष्ट.. ⚡कुडाळ ता.२४-: नेरूर जिल्हा परिषद मतदार संघातील इतर गावसह सर्वांचा मला पाठिंबा आहे. स्थानिक म्हणून गावनेच मला निवडून देण्याचा शब्द दिला आहे, अस नेरूर देऊळवाडा जि प मतदार संघातुन अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे रुपेश पावसकर यांनी स्पष्ट केलं. याबाबतची भूमिका २७ जानेवारीला स्पष्ट करणार असल्याच…

Read Full News

आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. सर्यवंशी यांच्याकडे…

⚡मुंबई दि.२४-: आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत डॉ. डी. एन. सर्यवंशी (भाप्रसे), विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आदेश निर्गमित केले आहेत. सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून २३ जानेवारी २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्काळ…

Read Full News

JCI सावंतवाडीने घेतली नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांची सदिच्छा भेट…

⚡सावंतवाडी ता.२४-: ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल (JCI) सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. यावेळी युवराज लखमराजे भोसले हे देखील उपस्थित होते. या भेटीदरम्यान JCI संस्थेची ध्येयधोरणे, युवक सक्षमीकरणासाठी सुरू असलेले उपक्रम तसेच शहरात राबविण्यात येणाऱ्या सामाजिक व विकासात्मक प्रकल्पांची सविस्तर माहिती नगराध्यक्षांना देण्यात आली. JCI सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असून…

Read Full News

You cannot copy content of this page