Headlines

Global Maharashtra Breaking News

कोकिसरे महालक्ष्मी शिक्षण मंडळाचे सचिव हरीश नारकर यांचे निधन

*💫वैभववाडी दि.१७-:* कोकिसरे येथील श्री महालक्ष्मी शिक्षण मंडळाचे विद्यमान सचिव हरीश सखाराम नारकर (७०) यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने मंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. नारकर हे श्री महालक्ष्मी शिक्षण मंडळाच्या माधवराव पवार विद्यालयाचे माजी विद्यार्थी होते. त्याच विद्यालयाच्या शिक्षण मंडळात गेली २५ वर्षे ते सचिव म्हणून काम पाहत होते. कोकिसरे सारख्या ग्रामीण भागात…

Read Full News

अवजड यंत्रसामुग्रीने वैभववाडी शहरामध्ये उत्खनन

आवाजामुळे शहरातील लोकांना होतोय ध्वनिप्रदूषणाचा त्रास : मनसे तालुका अध्यक्ष सचिन तावडे यांनी दिले पोलीस निरीक्षकाना निवेदन *💫वैभववाडी दि.१७-:* वैभववाडी शहरांमध्ये रात्रीच्यावेळी अवजड यंत्रसामुग्रीने खाजगी विकासक जमीन उत्खनन व भरावची कामे करत आहेत.मशीन व वाहनांच्या आवाजामुळे शहरातील लोकांना ध्वनिप्रदूषणला सामोरे जावे लागत आहे. या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वैभववाडी तालुका अध्यक्ष सचिन तावडे यांनी पोलीस…

Read Full News

“शब्दगंध” उपक्रमाअंतर्गत यावर्षीही ६ शाळांमध्ये वाचनालय सुरू

सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान तर्फे राबवण्यात आला उपक्रम *💫सावंतवाडी दि.१७-:* सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी द्वारे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाद्वारे समाजहित जपण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जातो. आजकाल विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचा अभाव दिसत असून, कदाचित हा टीव्ही चा दुष्परिणाम असू शकतो. परंतु वाचन संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने प्रतिष्ठान द्वारे यापूर्वी…

Read Full News

संघटीत गुन्हेगारी विरुध्द जिल्हा पोलीसांची मोक्का कायद्यान्वये धडक कारवाई…

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि.17 : सांवतवाडी तालूक्यात गवळी तिठा येथे रस्तावर वाहन आडवून लुटमार केल्याप्रकरणी गुन्हायाचे गांभीय ओळखुन पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग राजेंद्र दाभाडे , अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तुषार पाटील यांनी पोलीस निरीक्षक,गुन्हे शाखा सिंधुदुर्ग सुनिल धनावडे यांना विशेष पोलिस तपास पथक तयार करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे विशेष पोलीस पथक तयार करुन पथकामार्फत…

Read Full News

सलग दुसऱ्या वर्षी एडुझोन द हब (महेश ट्युटोरीअल्स) चे विद्यार्थी JEE Mains मध्ये रत्नागिरीत अव्वल…

फेब्रुवारी 2021 मध्ये झालेल्या JEE Mains च्या परीक्षेत एडुझोनच्या विद्यार्थ्यांचे अतुलनीय यश *💫रत्नागिरी दि.१७-:* कोकणातील नामवंत इन्स्टिटयूट एडुझोन द हब पॉवर्ड बाय महेश ट्युटोरीअल्स या संस्थेतील विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये झालेल्या इंजिनिअरिंगची पूर्व परीक्षा JEE Mains मध्ये कौतुकास्पद यश संपादन केले आहे. यामध्ये चिन्मयी पाटणकर ही 97.80 percentile सह प्रथम आली आहे. तर श्रेया तळेकर…

Read Full News

एनसीसी विद्यार्थ्यांकडून हुतात्मा रेगे स्मारक परिसराची साफसफाई…

*💫मालवण दि.१७-:* मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील प्रा. एम. आर. खोत व एन.सी.सी. विभागातील विद्यार्थ्यांनी कुंभारमाठ येथील हुतात्मा रेगे स्मारक तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याठिकाणी साफसफाई केली. स्मारक तसेच पुतळे यांची देखभाल घेतली जावी व त्याठिकाणी होणारे गैरप्रकार थांबावेत या हेतूने हे समाजकार्य केल्याचे प्रा. खोत यांनी सांगितले. स्वातंत्र्यसैनिक तसेच थोर व्यक्तींची…

Read Full News

नीलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त नांदोस येथे मिरी रोप वाटप

मालवण सभापती अजिंक्य पाताडे याचा उपक्रम *💫मालवण दि.१७-:* भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सभापती अजिंक्य पाताडे यांच्या संकलपनेतून नांदोस ग्रामपंचायत येथे शेतकऱ्यांना मिरी रोप तसेच महाबीजचे भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी सभापती अजिंक्य पाताडे यांच्यासह नांदोस सरपंच सौ. नांदोसकर, शक्ती केंद्र प्रमुख विजय निकम, ज्येष्ठ कार्यकर्ते जयवंत परब, रमेश पुजारे,…

Read Full News

कोलगाव येथील हायमास्ट लॅंम्पचा भूमिपूजन सोहळा संपन्न

*आमदार दिपक केसरकर यांनी दिलेल्या निधीतून उभारण्यात येणार हायमास्ट* सावंतवाडी, दि.१७:- माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्या निधीतून कोलगांव मारुती मंदिर येथे हायमास्ट उभारण्यात येत आहे.या हायमास्ट चे भुमिपूजन कोलगांव जि.प.सदस्य मायकल डिसोजा व स्थानिक ग्रामस्थांच्या यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या आधीही कोलगांवमध्ये विकासकामांसाठी भरीव निधी हा आला आहे,येत्या काळातही मी स्वतः पुढाकार…

Read Full News

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सर्वसाधारण सभा 18 रोजी

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.-17 सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 18 मार्च 2021 रोजी दुपारी ठिक 2.30 वाजता बँ.नाथ पै समिती सभागृह सिंधुदुर्गनरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

Read Full News

जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा 18 रोजी

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.-17 सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा दिनांक 18 मार्च 2021 रोजी दुपारी ठिक 12 .00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

Read Full News

You cannot copy content of this page