*💫वैभववाडी दि.१७-:* कोकिसरे येथील श्री महालक्ष्मी शिक्षण मंडळाचे विद्यमान सचिव हरीश सखाराम नारकर (७०) यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने मंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. नारकर हे श्री महालक्ष्मी शिक्षण मंडळाच्या माधवराव पवार विद्यालयाचे माजी विद्यार्थी होते. त्याच विद्यालयाच्या शिक्षण मंडळात गेली २५ वर्षे ते सचिव म्हणून काम पाहत होते. कोकिसरे सारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेतल्यानंतर नोकरी व्यवसायानिमित्त ते मुंबई येथे स्थायिक झाले. मिल मध्ये सुपरवायझरची नोकरी करीत असताना त्यांनी मुंबई येथील को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळत होते. त्यांना समाजसेवेची पूर्वीपासूनच आवड होती. समाजातील तळागाळातील नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी महालक्ष्मी शिक्षण मंडळात आमूलाग्र बदल केले. या संस्थेत ते २५ वर्षे सचिव म्हणून काम पाहत होते.महालक्ष्मी शिक्षण मंडळाकडून माधवराव पवार विद्यालय चालविण्यात येते. स्थानिक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण एकाच ठिकाणी मिळावे यासाठी शिक्षण मंडळाने दोन वर्षांपूर्वी ११ व १२ कॉमर्स चे वर्ग सुरू केले होते.हे वर्ग सुरू करण्यात नारकर यांचा मोलाचा वाटा होता. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने महालक्ष्मी शिक्षण मंडळाचे अपरिमित हानी झाली आहे. मनमिळाऊ स्वभाव व अभ्यासू वृत्तीमुळे ते जनमानसात त्यांना एक वलय होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आहे. फोटो:हरिश नारकर
कोकिसरे महालक्ष्मी शिक्षण मंडळाचे सचिव हरीश नारकर यांचे निधन
