Headlines

Global Maharashtra Breaking News

माजी सभापती रविंद्र मडगांवकर यानी घेतली कोरोना लस…

*💫सावंतवाडी दि.०५ -:* सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र मडगावकर यांनी आज सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस घेतली आहे. तसेच यावेळी त्यानी सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन नागरिकांना केले आहे.

Read Full News

व्हीक्टर डांटस यानी घेतली कोरोना लस…

जिल्हा बँक संचालक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते व्हीक्टर डांटस यानी सोमवारी जिल्हा रुग्णालयात जात कोरोना लस घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील उपस्थित होते. डांटस यानी ४५ वर्षावरिल सर्वांनी कोरोना लस घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Read Full News

पत्रादेवी मिठगुढी येथे दुचाकी अपघात…

वाफोलीतील तरुण गंभीर जखमी : अधिक उपचारासाठी बांबोळीला हलविले_* *💫बांदा दि.०४-:* गोव्यातून वाफोली येथे परतत असताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने आत्माराम मोहन गवस (४२, रा. वाफोली टेंबवाडी) हा तरुण गंभीररीत्या जखमी झाला. सदर अपघात पत्रादेवी मिठगुढी येथे सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला. सामाजिक कार्यकर्ते सुशांत पांगम, धीरज भिसे, दीपक पडवळ व शांताराम पार्सेकर यांनी आत्मारामला उपचारासाठी…

Read Full News

काजूला शासनाने हमीभाव द्यावा…

शरद पवार यांचे वेधणार लक्ष : युवक राष्ट्रवादीचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शैलेश लाड यांची माहिती_ *💫बांदा दि.०४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यापारी व कारखानदार यांच्या युतीमुळे जिल्ह्यातील काजू बागायतदार आर्थिक अडचणीत अडकले आहेत. जिल्ह्यातील काजूला जीआय मानांकन मिळाल्याने पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर काजूला शासनाने हमीभाव द्यावा यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांचे लक्ष…

Read Full News

मालवणच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि नगरसेवक गणेश कुशे यांचे उद्यापासून उपोषण

मालवण दि प्रतिनिधी अपूर्ण अवस्थेतील भुयारी गटार योजना, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बाबत धर्मदाय आयुक्तांचे गहाळ झालेले पत्र, आरोग्याची समस्या व भाजी मार्केट येथील अनधिकृत गाळ्याचा प्रश्न या आणि इतर विविध प्रश्नांबाबत मालवण नगरपालिकेचे प्रशासन, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष अपयशी ठरल्याने या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी उद्या दि. ५ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या आमरण उपोषणावर आपण ठाम असल्याची भूमिका…

Read Full News

लागलेले आंबे आगीच्या भक्ष्यस्थानी…

लाखोंनी रूपयांचे नुकसान:आचरा माळरानावरील घटना:देऊळवाडीतील ग्रामस्थानी मिळविले आगीवर नियंत्रण मालवण दि प्रतिनिधी आचरा शेतमाळावर आज दुपारच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत आंबा कलम बागा भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ऐन आंब्याच्या हंगामात धरलेली आंब्याची कलमे आगीत जळून गेल्याने शेतकऱ्यांची हानी झाली आहे. लागल्याचे समजताच आचरा देउळवाडीतील ग्रामस्थांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला…

Read Full News

रेवंडी ग्रामस्थाचे उद्या खाडीपात्रात उपोषण…

कांदळवन बंधारा नासधुस प्रकरणी प्रशासनाने लक्ष न घातल्याने निर्णय मालवण दि प्रतिनिधी खालची रेवंडी किनाऱ्यालगत कांदळवन व पतन विभागाच्या संरक्षक बंधाऱ्यांची तोडफोड करून काही व्यक्तींनी खाडीपात्रात केलेल्या अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या रेवंडी ग्रामस्थांनी इशारा दिल्याप्रमाणे उद्या सोमवार दि ५ एप्रिल सकाळी १० वाजल्यापासून रेवंडी खाडीपात्रात उतरून आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज ११ कोरोना रुग्ण…

शहरात तीन तर ग्रामीण भागांत ८ रुग्ण *💫सावंतवाडी दि.०४-:* सावंतवाडी तालुक्यातील आज नवीन ११ रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात ८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये ग्रामीण भागात माडखोल धवडकी येथे तीन, माजगाव, मळेवाड , मळगाव, बांदा , सावरवाड येथे प्रत्येकी एक एक रुग्ण…

Read Full News

संदेश सावंत वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

नाटळ सांगवे विभागीय कार्यालयात करण्यात आले होते आयोजन *💫कणकवली दि.०४-:* माजी जि प अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या 46 व्या वाढदिवसाच्या औचित्याने आज रविवार दिनांक ४ एप्रिल नाटळ सांगवे विभागीय कार्यालय येथे आयोजित रक्तदान शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा सौ संजना संदेश सावंत ,जि प अध्यक्ष सिंधुदुर्ग यांच्या हस्ते झाले यावेळी…

Read Full News

जिल्ह्यात आज तीन कोरोना बळी…

८८ नवीन रुग्ण:३० जणांनी केली मात *💫सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 573 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 638 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 88 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. ३० रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. तसेच तीन रुग्णाचे निधन झाले असल्याची…

Read Full News

You cannot copy content of this page