नाटळ सांगवे विभागीय कार्यालयात करण्यात आले होते आयोजन
*💫कणकवली दि.०४-:* माजी जि प अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या 46 व्या वाढदिवसाच्या औचित्याने आज रविवार दिनांक ४ एप्रिल नाटळ सांगवे विभागीय कार्यालय येथे आयोजित रक्तदान शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा सौ संजना संदेश सावंत ,जि प अध्यक्ष सिंधुदुर्ग यांच्या हस्ते झाले यावेळी मा श्री संदेश उर्फ गोट्या सावंत , प स सदस्या स्मिता मालडीकर, सांगवे सरपंच मयुरी मुंज, विभागीय अध्यक्ष विजय भोगले, प्रफुल्ल काणेकर, नितीन गावकर, गणेश सावंत, सुशांत सावंत आणि विठ्ठल रासम उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबीरात योग्य ती काळजी घेण्यात आली होती. मा श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत (माजी जि प अध्यक्ष सिंधुदुर्ग ) यांच्या 46 व्या वाढदिवसाच्या औचित्याने आज रविवार दिनांक ४ एप्रिल नाटळ सांगवे विभागीय कार्यालय येथे आयोजित रक्तदान शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा सौ संजना संदेश सावंत ,जि प अध्यक्ष सिंधुदुर्ग यांच्या हस्ते झाले यावेळी मा श्री संदेश उर्फ गोट्या सावंत , प स सदस्या स्मिता मालडीकर, सांगवे सरपंच मयुरी मुंज, विभागीय अध्यक्ष विजय भोगले, प्रफुल्ल काणेकर, नितीन गावकर, गणेश सावंत, सुशांत सावंत आणि विठ्ठल रासम उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबीरात योग्य ती काळजी घेण्यात आली होती.
