Headlines

Global Maharashtra Breaking News

आंबोली-चौकुळमध्ये राष्ट्रवादीकडून ताडपत्री वाटप

निमित्त २२ व्या वर्धापन दिनाचे;तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवींचा उपक्रम सावंतवाडी : आंबोली-चौकुळ ‌येथील काही भागात अतिवृष्टीचा तडाखा बसला. यातील नुकसानग्रस्त लोकांना राष्ट्रवादीचा माध्यमातून मदतीचा हात देण्यात आला. राष्ट्रवादीचा २२ व्या वर्धापनदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माध्यमातून नुकसानग्रस्तांना ताडपत्रीच वाटप करण्यात आले. चौकुळ, चिखलव्हाळ बेरडकी आदी गावात तालुका राष्ट्रवादीचावतीनं हे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी…

Read Full News

कोरोनाच्या वाढत्या रुग्णामुळे देवली बंडावाडी प्रतिबंधित क्षेत्र घोषित

२४ जूनपर्यंत असणार निर्बंध सरपंच गायत्री चव्हाण यांची माहिती *💫मालवण दि.१२-:* देवली बंडावाडीत कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काल सायंकाळपासून २४ जून रात्री आठ वाजेपर्यंत पूर्ण बंडावाडी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे अशी माहिती सरपंच गायत्री चव्हाण व ग्रामसेविका वेदिका गोसावी यांनी दिली. प्रतिबंधित वाडीतील कोणतीही व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्याकडून…

Read Full News

शेतकरी व नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करण्यासाठी कोविड चाचणी बंधनकारक करून जिल्हा प्रशासन करतेय अन्याय

सत्ताधारी लोकप्रतिनिधी व सर्वसामान्याना देण्यात येणाऱ्या न्यायात दुजाभाव;मनसे नेते अमित इब्रामपुरकर यांची जिल्हाप्रशासनावर टीका *💫मालवण दि.१२-:* जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकर्‍यांना तसेच नागरिकांना जाण्यासाठी कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह असावा असे प्रशासनाने बंधनकारक केले आहे तर दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांच्या लवाजम्यासह असणारे मुंबईपासूनचे कार्यकर्ते यांना कोरोना चाचणी अहवालाची गरज नाही का? त्यांचे इ-पास सुद्धा तपासले…

Read Full News

पाचशे रुग्णवाहिका खरेदीतून सिंधुदुर्गच्या वाट्याला केवळ नऊ रुग्णवाहिका हे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीचे अपयश

मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची टीका *💫कुडाळ दि.१२-:* सार्वजनिक आरोग्य विभागाकडील रुग्णवाहिका वाटपात जिल्ह्यावर अन्याय केला आहे,राज्य शासनाच्या 500 रुग्णवाहिक खरेदीतून सिंधुदुर्गच्या वाट्याला फक्त 9 रुग्णवाहिका हे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे अपयश असल्याचा टोला लगावत रुग्णवाहिकांच्या आडून जिल्ह्याने पाहिलेला श्रेयवाद व अनावश्यक उदघाटने, आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड चाचण्यांचे दैनंदिन टार्गेट हा जिल्ह्याप्रशासनाच्या “कोरोना” उत्सवाचाच भाग आहे अशी मनसेचे…

Read Full News

मालवणात पावसाची जोरदार हजेरी

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा परिणाम;हवामान खात्याने दिला होता अतिवृष्टीचा इशारा *💫मालवण दि.१२-:* बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने हवामान विभागाने जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला असताना मालवणात आज सायंकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. तर दिवसभर समुद्र खवळलेला राहिल्याने जोरदार लाटा किनाऱ्यावर उसळत होत्या. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने…

Read Full News

ना.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फार्मसी कॉलेज शिरवल येथे उद्या वृक्षारोपण

*💫कणकवली दि.१२-:* महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने सेवाभावी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्यावतीने रविवार १३ जून रोजी सकाळी ९ वाजता विजयराव नाईक फार्मसी कॉलेज शिरवल येथे वृक्षारोपण केले जाणार आहे. तसेच सायंकाळी ४ वाजता ओरोस येथे कोरोना योद्धा…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी ६११ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण २६ हजार २२० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६,हजार ५७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६११ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

वायरी समुद्रकिनाऱ्यावर जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले

कासवाला स्थानिक मच्छिमारांनी दिले जिवदान;वन विभाग व वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम च्या टीमने केले पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार *💫मालवण दि.१२-:* मालवण वायरी समुद्र किनाऱ्यावर आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास खराब जाळ्यात अडकलेले ऑलिव्ह रिडले मादी जातीचे कासव वाहून आल्याचे स्थानिक मच्छीमारांना दिसून आले. स्थानिक मच्छीमारांनी कासवाची जाळ्यातून सुटका त्याला जीवदान दिल्यावर वन विभाग व कोकण वाईल्ड…

Read Full News

मालवणला कोरोनामुक्त करण्यासाठी भाजपचा ऍक्शन प्लॅन

वॉर्डनिहाय पाच जणांची समिती नेमून करणार उपाययोजना;माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांची माहिती *💫मालवण दि.१२-:* मालवण शहर आणि परिसरात कोरोना रुग्णाची संख्या प्रचंड वाढत असून कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे संपुर्ण मालवण शहर कोरोनाच्या विळख्यात सापडल्यात जमा आहे. कोरोना चाचणीकडे दुर्लक्ष केल्याने दुर्दैवाने अनेकांचा मृत्यू होत आहे. राज्यकर्त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे असून भाजपच्यावतीने मालवण…

Read Full News

जिवावर बेतणाऱ्या केमिकलयुक्त दारूचा मालवणात सुळसुळाट

दारू पिल्याने अनेकजण आजारी कारवाई करण्याची जिल्हा विदेशी मध्य विक्रेता संघाचे अध्यक्ष शेखर गाड यांची मागणी *💫मालवण दि.१२-:* जिवावर बेतणाऱ्या केमिकालयुक्त दारूचा मालवणात सुळसुळाट झाला आहे. ही दारू पिल्याने अनेकजण आजारी पडत आहेत. काहींचे मृत्यू झाले आहेत. तरी याप्रश्नी प्रशासनाने, संबंधित विभागाने तात्काळ लक्ष देत कारवाई करावी. अशी मागणी जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघ, सिंधुदुर्ग…

Read Full News

You cannot copy content of this page