२४ जूनपर्यंत असणार निर्बंध सरपंच गायत्री चव्हाण यांची माहिती
*💫मालवण दि.१२-:* देवली बंडावाडीत कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काल सायंकाळपासून २४ जून रात्री आठ वाजेपर्यंत पूर्ण बंडावाडी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे अशी माहिती सरपंच गायत्री चव्हाण व ग्रामसेविका वेदिका गोसावी यांनी दिली. प्रतिबंधित वाडीतील कोणतीही व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्याकडून १ हजार रुपये दंड व कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर कोविड पॉझिटिव्ह रुग्ण घराबाहेर दिसल्यास फोजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. अत्यावश्यक सेवेसाठी सूट असेल. परंतु कोविडच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. वाडीत शासकीय कर्मचारी, ग्रामकृती समिती सदस्य यांच्या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश असणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक उपाययोजना म्हणून आज बंडावाडीतील सर्व ग्रामस्थांची चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात आरटीपीसीआर करण्यात आली असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
